बुलढाणा : जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजामातेचा दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो. त्यानिमित्य राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि राष्ट्रमाता जिजाऊंच जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आला आहे. महिला आणि पुरुष यांनी भगवे फेटे परिधान करून "तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय "अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरीक येत आहेत. सकाळीच राजे लखोजी जाधव यांचे वंशज यांनी राजमाता जिजाऊची आरती केली आणि जिजाऊ वंदन केले त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतिश बाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सकाळीच राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज घडवले : राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासूनच शिवरायांवर रामायण आणि महाभारातचे संस्कार रुजवले.वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी छत्रपती शिवबा यांचा हातात शहाजीराजांनी पुण्याची जहागीर सुपूर्द केली. आई जिजाऊ यांनी दिलेल्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षानुवर्षे चालणारी गुलामगिरी मोडून काढली. स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. राजमाता जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले : शहाजीराजे भोसले हे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होय. जिजाबाईं यांचा शहाजीराजांशी यांच्याशी दौलताबाद येथे विवाह डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये झाला.निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय भीषण होती. त्यांच्या विरुद्ध एक शब्द काढायची हिम्मत कोणामध्ये नव्हती. या जुलमी सत्तेच्या बंधनातून रयतेची सुटका करावी असे जिजामातांना नेहमी वाटत होते. अशा बिकट परिस्थिती स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले.19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.आपल्या पतीचे स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरले. नुसते पेरले नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवले.
संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले : राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञानाच्या दुर्य चरित्र संघटना व पराक्रम अशा राजास व सद्गुणाचे बाळकडू पाजले.प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी राजमाता ने शिकवण शिवरायांना दिली होती.शिवाजीराजे १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली.कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजामाता आणि शिवाजी महराज पुण्यात येऊन दाखल झाले.व उद्ध्वस्त झालेले पुणे, दिमाखात वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिले. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाऊंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर शिवरायांना राजकारणाचे पहिले धडेही दिले.