राजस्थान- चार वर्षाचा मुलगा ९० फूट बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानमधील जल्लोर जिल्ह्याच्या लाछडी गावात घडली आहे. या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी राज्य आपत्कालीन मदत दलाचे (एसडीआरएफ) जवान पोहोचले आहेत. मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मोहिम सुरू आहे. अजय असे मुलाचे नाव आहे.
अजयने बोअरवेलवरील लोखंडी तारा काढून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो बोअरवेलमध्ये कोसळला. राज्य आपत्कालीन मदत दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. यामध्ये उपविभागीय अधिकारी भुपेंद्र यादव, तहसिलदार देसलारा, वैद्यकीय अधिकारी ओमप्रकाश सुतार, उपपोलीस अधीक्षक विरेंद्र सिंह आणि पोलीस अधिकारी प्रवीण या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा-मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर
मुलाची हालचाल पाहण्यासाठी बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडण्यात आलेला आहे. तसेच मुलाला दोरीने पाण्याची बाटलीही देण्यात आलेली आहे. मुलाचे प्राण वाचविण्यासाठी बोअरवेलमधून ऑक्सिजनही सोडण्यात आलेला आहे.
हेही वाचा-भांडुपच्या उत्साही मित्र मंडळाकडून लसीकरण मोहिमेबाबत डोगराळ भागामध्ये जनजागृती
दरम्यान, यापूर्वीही बोअरवेलमध्ये लहान मुले पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.