ETV Bharat / bharat

करणी सेनेच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या, पाहा थरारक Video - करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी

Karni Sena President Killed : राजपूत करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूरमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला.

Sukhdev Singh Gogamedi
Sukhdev Singh Gogamedi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 4:07 PM IST

Updated : Dec 5, 2023, 7:11 PM IST

पाहा व्हिडिओ

जयपूर (राजस्थान) Karni Sena President Killed : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी अद्याप पुरेशी शमली नसताना, राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी जयपूरमध्ये मंगळवारी (५ डिसेंबर) राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार : अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी दुपारी श्याम नगर भागातील त्यांच्या घरावर गोळीबार केला. यामध्ये सुखदेव सिंग गोगामेडी यांना गोळी लागली. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, गोगामेडी मंगळवारी दुपारी श्याम नगर भागातील त्यांच्या घरी होते. तेव्हा स्कूटरवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गोळी लागल्यानं गोगामेडी गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

यानं स्वीकारली जबाबदारी : गँगस्टर रोहित गोदारा यानं या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानं अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या गोळीबारात गोगामेडी यांच्यासह आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. तर हल्लेखोर ज्या स्कूटी चालकावर गोळी झाडून फरार झाले होते, त्याचाही मृत्यू झाला आहे. श्याम नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी मनीष गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे. फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी घटनास्थळावरून १८ राउंड काडतुसं जप्त केली.

समाजात संतापाचं वातावरण : या घटनेबाबत समाजातील लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेवा राज्य अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाली. बातमी कळताच त्यांचे अनेक समर्थक आणि समाजातील लोक घटनास्थळी जमा झाले. न्याय मिळावा या मागणीसाठी हे लोक कुटुंबीयांसह रुग्णालयाबाहेर धरणे धरून बसले आहेत. गोगामेडी यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. सर्वाधिक FIR दाखल झालेल्या राज्यांत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, तर महिलांसंदर्भातील गुन्हे दिल्लीपेक्षा कमी
  2. धक्कादायक! गर्लफ्रेंडची हत्या करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला लावला फोटो

Last Updated : Dec 5, 2023, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.