बारमेर (राजस्थान) Rajasthan Accident : राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात सोमवारी ट्रेलर आणि कारमध्ये भीषण धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एक जोडपं आणि तीन मुलांचा समावेश आहे. हे सर्व महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं.
जैसलमेरला जाताना अपघात झाला : धोरिमान्ना पोलीस स्टेशनचे अधिकारी सुखराम बिश्नोई यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील एक कुटुंब कारमधून जैसलमेरला जात होतं. दरम्यान, बाडमेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६८ वर सुरते की बेरीजवळ ट्रेलर आणि कारमध्ये धडक झाली. सोमवारी, (१३ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.
मृतांची नावं : धनराज (वय ४५ वर्ष) रा. भडगाव महाराष्ट्र, स्वरांजली (५ वर्ष), प्रशांत (५ वर्ष), भाग्य लक्ष्मी (१ वर्ष) आणि गायत्री (२६ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. तर सोनवरो (४० वर्ष) हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आलाय.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस अपघात : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ येथे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर सोमवारी एक मोठा अपघात झाला. एक्स्प्रेस वेवर एक अनियंत्रित कार कल्व्हर्ट तोडून खाली पडली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका मुलीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तीनही मृतक दिल्लीचे रहिवासी आहेत.
हेही वाचा :
- Buldhana Accident News : अपघातात मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; मेहकर मधील श्रीमंत भिकारी
- Accident on Bandra Worli Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ
- Accident on Delhi Jaipur Highway : दिल्ली जयपूर महामार्गावर ऑईल टँकरच्या धडकेत कार जळून खाक; चार जणांचा होरपळून मृत्यू