नवी दिल्ली - स्वस्त आणि मस्त प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. अनेक जण लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देतात. रेल्वेला प्रवास भाड्यातून आणि मालवाहतूकीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. पण रेल्वेला कमाईचा आणखी एक मार्ग आहे. तत्काळ तिकिटांतून ( IRCTC Tatkal Ticket ) भारतीय रेल्वेची चक्क 500 कोटींपेक्षा अधिक कमाई ( Railways earned over Rs 500 crore from Tatkal ) झाली आहे.
भारतीय रेल्वेने 2020-21 या कालावधीत तत्काळ तिकीट शुल्कातून 403 कोटी रुपये, प्रीमियम तत्काळ तिकिटांमधून 119 कोटी रुपये आणि डायनॅमिक भाड्यातून 511 कोटी रुपये कमावले आहेत. मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती समोर आली आहे.
लाखो लोक तिकीट बुक करतात व मग रद्द करतात. तिकीट रद्द केल्यावर एक किरकोळ रक्कम रेल्वे कापून घेते. पण ही किरकोळ रक्कम लाखो लोकांनी तिकिटे रद्द केल्यावर खूप मोठी होते.
रेल्वेने 2021-22 या आर्थिक वर्षात डायनॅमिक भाड्यातून 240 कोटी रुपये तर तत्काळ तिकिटांमधून 353 कोटी रुपये आणि प्रीमियम तत्काळ शुल्कातून 89 कोटी रुपये कमावले आहेत. मात्र, 2019-20 च्या तुलनेत ही रक्कम कमी आहे. कारण, 2019-20 आर्थिक वर्षात, रेल्वेचा प्रवास सुरळीत चालू होता. तेव्हा डायनॅमिक भाड्यांमधून 1,313 कोटी रुपये, तत्काळ तिकिटांमधून 1,669 रुपये आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांमधून 603 कोटी रुपये कमावले होते.
तिकिट बुकींग -
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आसन आरक्षण तक्त्या अंतिम झाल्यानंतर प्रतीक्षा यादीत असलेले 52 लाखांहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करू शकले नाहीत. तर 2021-22 सप्टेंबर अखेरीस पीएनआर नोंदीवरुन, प्रतीक्षा यादीत असलेल्या 52,96,741 प्रवाशांपैकी अंदाजित 32,50,039 प्रवाशांचे बुक स्वयंचलितपणे रद्द करण्यात आले होते.
हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयात 2 आठवडे व्हर्च्युअल पद्धतीने होणार सुनावणी; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय