नवी दिल्ली - पेगास हेरगिरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेमध्ये सरकारला घेरण्याची तयारी चालविली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाष्ट्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आमंत्रित केले होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधींनी बैठकीत सांगितले.
राहुल गांधींच्या बैठकीत डावे पक्ष, शिवसेना, द्रमुक, राजद, तृणमू काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.
-
Attended the Opposition Party Meeting of Lok Sabha and Rajya Sabha Floor Leaders called by @INCIndia Leader - @RahulGandhi Ji at Constitution Club, New Delhi. pic.twitter.com/lcjgrRzCoC
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Attended the Opposition Party Meeting of Lok Sabha and Rajya Sabha Floor Leaders called by @INCIndia Leader - @RahulGandhi Ji at Constitution Club, New Delhi. pic.twitter.com/lcjgrRzCoC
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2021Attended the Opposition Party Meeting of Lok Sabha and Rajya Sabha Floor Leaders called by @INCIndia Leader - @RahulGandhi Ji at Constitution Club, New Delhi. pic.twitter.com/lcjgrRzCoC
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2021
यावेळी आम आदमी पक्षाचे नेते गैरहजर होते. सर्व शक्तींची एकजूट करणे, ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब आहे. जेवढे लोक एकत्रित, तितका आवाज शक्तीशाली होईल. त्यामुळे भाजप-आरएसएसला दाबून टाकणे कठीण होईल, असे राहुल गांधींनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत सांगितले.
बैठकीनंतर विरोधी पक्षनेते हे सायकलीने संसदेच्या दिशेने जात आहेत.
सोमवारी संसद भवनमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या कक्षात विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत नेत्यांनी संसदेमध्ये पेगाससवर चर्चा करण्याची गरज व्यक्त केले. तसेच त्याबाबत मागणी लावून धरण्याचा निश्चय व्यक्त केला. सुत्राच्या माहितीनुसार प्रति संसदेचे आयोजन करण्याचे काही विरोधी पक्षनेत्यांनी संकल्पना मांडली आहे. त्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य आणि पूर्णत: भाग - टी. एस. त्रिमुर्ती
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांची मागणी फेटाळली आहे. शुक्रवारी लोकसभेत बोलताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पेगासस हा मुद्दा नसल्याचे म्हटले होते.
हेही वाचा-जम्मू काश्मीर : बांदीपोरामध्ये सैन्यदल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, दहशतवादी ठार
काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकारने पेगाससची खरेदी केली का, हो किंवा नाही एवढंच उत्तर आम्हाला हवं आहे असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला होता.
हेही वाचा-संजय राऊत यांनी घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट; नेमकी कशावर चर्चा झाली?
राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांची एकजूट
सर्व विरोधक काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात एकवटल्याचे 28 जुलैलाही चित्र दिसून आले होते. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. तत्पूर्वी पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीचेही नेतृत्व राहुल गांधींनीच केले. या पत्रकार परिषदेत सर्व विरोधकांनी एकमुखाने चर्चेची मागणी केली. राहुल गांधींनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत सरकारने प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी, अशी मागणी केली.