ETV Bharat / bharat

Gandhi Family In Ranthambore : सोनिया गांधींचा 76वा वाढदिवस, सहकुटुंब घेतला रणथंबोर व्याघ्र सफारीचा आनंद - राहुल गांधी

37 वर्षांनंतर संपूर्ण गांधी कुटुंब रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये (Ranthambore national park) एकत्र दिसले आहे. यापूर्वी 1985 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटुंबीयांसह रणथंबोरला पोहोचले होते. त्यावेळी राजीव गांधींसोबत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित होते. (Gandhi Family In Ranthambore).

Gandhi Family In Ranthambore
Gandhi Family In Ranthambore
author img

By

Published : Dec 9, 2022, 8:56 PM IST

सवाई माधोपूर (राजस्थान) : भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधींनी शुक्रवारी रणथंबोरमध्ये सोनिया गांधी यांचा ७६ वा वाढदिवस (Sonia Gandhi birthday) बहीण प्रियंका गांधींसोबत साजरा केला. या दरम्यान संपूर्ण कुटुंबाने संध्याकाळी रणथंबोरमध्ये टायगर सफारी केली. त्यावेळी त्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाघ आणि वाघिणीचे दर्शन झाले. (Rahul Sonia watch tiger in Ranthambore).

सहकुटुंब सफारीचा आनंद : शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी टायगर सफारीचा आनंद लुटला. संपूर्ण कुटुंबाने मलिक तालाब येथे वाघिणीचे दर्शन घेतले. याशिवाय गुलर तालाब येथे त्यांना आणखी एक वाघ दिसला. यादरम्यान संपूर्ण कुटुंबही जोगी महालात पोहोचले. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचे टायगर सफारी करतानाचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर सफारीपूर्वी सोनिया आणि प्रियंका गांधी रणथंबोर रोडवर असलेल्या एका हस्तकला केंद्रात पोहोचल्या. येथे त्यांना हस्तकला केंद्रांचे निरीक्षण केले. सध्या संपूर्ण गांधी कुटुंब रणथंबोरमध्ये असून ते पुन्हा एकदा टायगर सफारीचा आनंद लुटण्याची शक्यता आहे.

1985 मध्येही दिली होती भेट : 37 वर्षांनंतर संपूर्ण गांधी कुटुंब रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये एकत्र दिसले आहे. यापूर्वी 1985 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी आपल्या कुटुंबीयांसह रणथंबोरला पोहोचले होते. त्यावेळी राजीव गांधींसोबत सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही उपस्थित होते. गांधी कुटुंब सवाई माधोपूर येथील जोगी महल येथे मुक्कामास आहेत. 1985 मध्येही ते एथेच राहावयास होते.

भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधीही सामील होऊ शकतात : सोनिया गांधींसोबत प्रियंका गांधीही सवाई माधोपूरला पोहोचल्या आहेत. 12 डिसेंबरला त्या सवाई माधोपूरमधून राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात. सूत्रांच्या मते, १२ डिसेंबर रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत केवळ महिला प्रवासीच सहभागी होतील. त्याच दिवशी प्रियंका गांधीही राहुल गांधींसोबत सवाई माधोपूर येथून भारत जोडो यात्रेत दिसू शकतात.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.