ETV Bharat / bharat

Putrada Ekadashi 2022 : 'ही' आहे पुत्रदा एकादशी व्रत करण्याची योग्य पद्धत; माहित नसेल तर जाणून घ्या - putrada ekadashi vrat katha

श्रावण महिन्याला ( shravan month ) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संतती सुखासाठी पुत्रदा एकादशी देशभरासह राज्यात अनेकांकडून भक्तिभावाने साजरी केली जाते. पुत्रदा एकादशी ( Putrada Ekadashi ) दिवशी भाविकांकडून व्रत ठेवले जाते. यात महिलांसह पुरूषांचाही सहभाग असतो. मात्र व्रताची योग्य विधी माहित नसल्याने काही भाविकांना केलेल्या व्रताचे योग्य फळ मिळत नाही त्यामुळे आज आपण पुत्रदा एकादशी वर्ताची योग्य पूजा विधी जाणून घेणार आहोत.

Putrada Ekadashi
पुत्रदा एकादशीचे
author img

By

Published : Aug 8, 2022, 10:49 AM IST

मुंबई - श्रावण महिन्याला ( shravan month ) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संतती सुखासाठी पुत्रदा एकादशी देशभरासह राज्यात अनेकांकडून भक्तिभावाने साजरी केली जाते. पुत्रदा एकादशी ( Putrada Ekadashi ) दिवशी भाविकांकडून व्रत ठेवले जाते. यात महिलांसह पुरूषांचाही सहभाग असतो. मात्र व्रताची योग्य विधी माहित नसल्याने काही भाविकांना केलेल्या व्रताचे योग्य फळ मिळत नाही त्यामुळे आज आपण पुत्रदा एकादशी वर्ताची योग्य पूजा विधी जाणून घेणार आहोत.

पुत्रदा एकादशी पूजा पद्धत - पुत्रदा एकादशी व्रत ( Putrada Ekadashi vrat ) पाळण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीच्या रात्रीपासून व्रताचे नियम पूर्णपणे पाळावेत. त्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नये आणि रात्री झोपण्याआधी भगवान विष्णूचे ध्यान करावे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर, दैनंदिन कामे झाल्यानंतर, स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. स्वच्छ धुतलेले कपडे घालून श्री विष्णूची पूजा करावी. ध्यान करावे. शक्य असल्यास पाण्यात पाणी मिसळून त्या पाण्याने स्नान करावे.या पूजेसाठी श्री विष्णूच्या फोटोसमोर दिवा लावून कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूची मूर्ती ठेवल्यानंतर मूर्तीला स्नान वगैरे करून पवित्र करून नवीन वस्त्रे परिधान करा. त्यानंतर विविध धूप दिव्यांनी भगवान श्री विष्णूची पूजा करून आरती करा. व व्रताचा संकल्प करा. त्यानंतर व्रत कथेचे पठन करा ( putrada ekadashi vrat katha ). शिव चालीसाचे पठन केल्यास त्याचाही लाभ होते ( shiv chalisa ). आपल्या क्षमतेनुसार नैवेद्य, फुले व फळे श्री विष्णूला अर्पण करा. ऋतूमुसार फळे, नारळ, सुपारी, आवळा इत्यादी फळे तुम्ही देवाला अर्पण करू शकता. एकादशीच्या रात्री भजन-कीर्तनात वेळ घालवा. दिवसभर उपवास ठेवा आणि संध्याकाळी फळ खा. ब्राह्मणांना भोजन द्या व दान करा. एकादशीला दिवे दान करण्याचे खूप महत्त्व आहे. या दिवशी दिवे दान जरूर करा. या व्रताच्या प्रभावामुळे मनुष्य तपस्वी व विद्वान, पुत्र इत्यादि अपार संपत्तीचा स्वामी होतो.

हेही वाचा - Putrada Ekadashi 2022 : पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्त्व; मुहूर्त आणि व्रत कथा जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.