चंदीगड - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक ऐतिहासिक निर्णय ( Bhagwant Mann historic decision ) घेतला आहे. मान यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली होती. यात त्यांनी थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटर नंतर पंजाबच्या लोकांची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर त्यांनी आता दिल्लीच्या धर्तीवर भष्टाचार रोखण्यासाठी सर्व सामान्यासाठी एक हेल्पलाईन नंबर जारी करण्याच्या घोषणा केली आहे. लाच मागणाऱ्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे. हा क्रमांक 23 मार्च रोजी प्रसिद्ध होईल.
दुसऱ्याच दिवशी घेतला ऐतिहासिक निर्णय -
नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात आप पक्षाने पंजाब राज्यात सत्ता मिळवली आहे. पक्षाने मोठ्या बहुमताने पंजाब राज्याची निवडणूक जिकली आहे. आपने भाजप, अकाली दल, काँग्रेस सारख्या प्रभावशाली पक्षांना मागे टाकत निवडणूक जिंकली. त्यानंतर बुधवारी आपचे नेते भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या गावात हजारो लोकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मान यांनी राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराशी दोन हात करण्याचे आश्वासन दिले होते. भगवंत मान हे राज्याचे 28 वे मुख्यमंत्री झाले आहेत. शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातील खटकर कलान गावात एका जाहीर सभेत त्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात होणार. आम्ही एकही दिवस वाया जावू देणार नाही. आधीच 70 वर्षांचा उशीर झाला आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी एक ऐतिहासिक निर्णय ( Bhagwant Mann historic decision ) घेतला आहे.
मोठ्या पक्षांचा केला पराभव -
आप पक्ष आता दिल्लीबरोबरच पंजाबमध्ये देखील सत्तेत आहे. पक्षाला पंजाबच्या निवडणुकीत 117 जागांपैकी 92 जागा जिंकण्यात यश मिळाले आहे. आप पक्षाने अकाली दल - बहुजन समाज पार्टी युती, अमरिंदर सिंह यांची लोक काँग्रेस पार्टी आणि भाजप सारख्या ताकतवर पक्षांचा पराभव केला आहे.
हेही वाचा - The Kashmir Files : द काश्मीर फाईल्स 10 राज्यांमध्ये करमुक्त, भाजपकडून प्रशंसा, विरोधकांत ओरड