नवी दिल्ली - पुलवामा हल्लाप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केला आहे. गुप्तचर विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा हल्ला झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
'शूटिंगमध्ये व्यस्त'
14 फेब्रुवारी 2019रोजी आपले पंतप्रधान शूटिंगमध्ये व्यस्त होते. मात्र त्यांना गुप्तचर विभागाच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यांच्या या दुर्लक्षामुळे पुलवामात आपले जवान हुतात्मा झाले. या गंभीर इशाऱ्याकडे का दुर्लक्ष करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला आहे. हल्लाप्रकरणी त्यांनी काही क्लिप्सही सादर केल्या.
40 जवाना हुतात्मा
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या बसला धडक दिली. यात 40 जवाना हुतात्मा झाले. ताफ्यामध्ये जवळपास 78 बसेस होत्या. यातून 2 हजार 500 सैन्यकर्मचारी जम्मू ते श्रीनगर प्रवास करीत होते.