श्रीहरिकोटा - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) कडून पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकल-सी 49 (पीएसएलव्ही सी49) चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून यशस्वीरीत्या झाले. या उपग्रहामुळे अंतराळातून चीन, पाकसारख्या शत्रूंवर नजर ठेवता येणार आहे. इस्रोचं हे 51 मिशन असून कोरोनाकाळातील पहिले मिशन आज पूर्ण झाले.
-
WATCH ISRO launches EOS01 and 9 customer satellites from Satish Dhawan Space Centre in Sriharikota pic.twitter.com/2ifOeAYIpx
— ANI (@ANI) November 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">WATCH ISRO launches EOS01 and 9 customer satellites from Satish Dhawan Space Centre in Sriharikota pic.twitter.com/2ifOeAYIpx
— ANI (@ANI) November 7, 2020WATCH ISRO launches EOS01 and 9 customer satellites from Satish Dhawan Space Centre in Sriharikota pic.twitter.com/2ifOeAYIpx
— ANI (@ANI) November 7, 2020
पीएसएलव्ही सी 49 सोबत 'ईओएस-01′ (अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट) एक प्राथमिक उपग्रह आणि नऊ इतर व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण झाले आहे. कोविडमुळे या प्रक्षेपणादरम्यान लाँच गॅलरी बंद करण्यात आली होती. तसेच माध्यमांनाही याठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. इस्रोच्या या प्रक्षेपणाचे लाईव्ह प्रसारण इस्रोची वेबसाईट, यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि ट्विटर पेजवरही पाहायला मिळाले.
ईओएस-01 ची वैशिष्ट्ये -
- ईओएस हे एक राडार रडार इमेजिंग सॅटेलाईट असून याचा मिलिटरी सर्व्हिलान्ससाठी वाप केला जाण्याची शक्यता आहे.
- एसएलव्ही सी 49 मार्फत भारताचा रडार इमेजिंग उपग्रह इओएस-01 हा अवकाशात पाठवण्यात आले. हे प्रकारच्या हवामानात स्पष्ट छायाचित्रे घेण्यासाठी सक्षम आहे.