गया - गयामध्ये दारू माफियाने पोलिसांच्या नाकात दम करुन सोडल्याने पोलिसांनी माफियाच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. दारू माफियांना पकडण्यासाठी पोलीस सर्व प्रकारचे तंत्र वापरत आहेत. गुरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेच एक प्रकरण समोर आले आहे. दारू माफियांच्या घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांना पाहुन दारू माफियाने धूम ठोकली. त्यामुळे हतबल झालेल्या पोलिसांनी पोपटाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोपटाने दिलेले उत्तर ऐकूण पोलिसही चक्रावून गेले आहेत. याचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उपनिरीक्षकाने विचारले कुठे आहे तुझा मालक : दारू माफिया पळून गेल्यानंतर पोलिसांनी पोपटाला पोपट अमृत मल्ला कुठे गेला ? असा सवाल केला. मात्र त्यावर पोपटाने काहीच उत्तर दिले नाही. गुरुआ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कन्हैया कुमार पोलिसांच्या पथकासह गावात दारू माफियावर छापा टाकण्यासाठी मंगळवारी रात्री गेले होते. मात्र दारू माफिया संपूर्ण कुटुंबासह घटनास्थळावरून पळून गेला. दारू तस्कर पळून गेला पण घरात पोपट तसाच राहिला. त्यामुळे पोपट पाहून कन्हैया कुमार यांनी त्याची विचारपूस सुरू केली.
पोपटाच्या चौकशीचा व्हिडिओ झाला व्हायरल : दारू तस्कर आणि त्याचे कुटुंब फरार झाल्यामुळे घरात फक्त पोपट होता. मग काय, उपनिरीक्षक कन्हैया कुमार हे पोपटालाच प्रश्न विचारू लागले. यावेळी त्यांनी पोपटाला अमृत मल्ला कुठे गेला आहे, असा सवाल केला. पोपटही पोलिसांचे प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक ऐकून आपल्या मनातील बोलून दाखवत होता. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले
पोपट म्हणत राहिला कटोरा कटोरा : उपनिरीक्षक कन्हैया कुमारने पोपटाला त्याच्या दारू तस्कर मालकाचा पत्ता विचारला. त्यामुळे मालकाशी एकनिष्ठ असलेल्या पोपटाने तोंड उघडले नाही. उलट त्याने कटोरा कटोरा असेच बोलत राहिला. त्यावर दारू भांड्यात बनते का? असे विचारले, मग अमृत मल्ला कुठे गेला? तुझा गुरु कुठे गेला? तुला सोडून पळून गेला आहे का. या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना पोपट फक्त एकच गोष्ट सांगत राहिला ते म्हणजे कटोरा कटोरा. त्यामुळे पोलिसांची हतबलता दिसून आला.
पोलीस झाले हतबल : या पोपटाला माणसाची भाषा समजते आणि तो खूप बोलत असल्याबाबतची माहिती नागरिक देतात. तरीही पोलिसांनी त्याचा गुरू आणि दारू माफिया अमृत मल्लाबाबत वारंवार विचारणा केली. मात्र पोपट इतका हुशार निघाला की, त्याने पोलिसांना कटोरा कटोरा याविशिवाय काहीच सांगितले नाही. पोलिसांच्या प्रश्नावर पोपटाने मौन बाळगले. आता पोपट आणि पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल माध्यमावर वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा - President Police Medal : देवेन भारतींसह राज्यातील ४ पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक; महाराष्ट्राला ७४ पदके