ETV Bharat / bharat

PRS Oberoi Passes Away : हॉटेल उद्योगाला नवी ओळख देणाऱ्या ओबेरॉय समूहाचे अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांचं निधन - पृथ्वीराज सिंग ओबेरॉय मराठी

PRS Oberoi Passes Away : ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांचे आज (14 नोव्हेंबर) सकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

PRS Oberoi Passes Away
पीआरएस ओबेरॉय यांचे निधन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 12:13 PM IST

नवी दिल्ली PRS Oberoi Passes Away : ओबेरॉय कंपनीनं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, पृथ्वीराज सिंह ओबेरॉय यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहेत. भगवंती ओबेरॉय चॅरिटेबल ट्रस्ट, ओबेरॉय फार्म, कापशेरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसंच ओबेरॉय ग्रुपमधील किंवा पीआरएस ओबेरॉय यांना ओळखणारा कोणीही अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकतो. ग्रुपच्या सर्व हॉटेल्स आणि कॉर्पोरेट ऑफिसमध्येही त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

हॉटेल व्यवसायाला दिली नवी दिशा : पीआरएस ओबेरॉय यांना भारतातील हॉटेल व्यवसायाचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून ओळखलं जातं. त्यांनी 2022 मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

पर्यटन आणि आदरातिथ्य यासाठी पद्मविभूषणनेही सन्मानित : पीआरएस ओबेरॉय यांना पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार आहे. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच बर्लिन येथील सहाव्या इंटरनॅशनल हॉटेल्स इन्व्हेस्टमेंट फोरमतर्फे त्यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. हॉटेल मॅगझिन यूएसए तर्फे 'कॉर्पोरेट हॉटेलियर ऑफ द वर्ल्ड', फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स, कॉर्पोरेट एक्सलन्ससाठी इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड्स, सीएनबीसी टीव्ही 18 इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स, बिझनेस इंडिया मॅगझिनचे बिझनेसमन ऑफ द इयर, अर्न्स्ट आणि 'यंग एंटरप्रेन्योर ऑफ द इयर' या अवॉर्ड्सनेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. actor Chandra Mohan passes away : ज्येष्ठ अभिनेता चंद्र मोहन यांचे निधन, सोमवारी होणार अंत्यसंस्कार
  2. demise of Bishan Singh Bedi : अंगद बेदी, नेहा धुपिया आणि कुटुंबीयांनी बिशन सिंग बेदींच्या निधनानंतर लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी
  3. Wagh Bakri Chai CEO : 'वाघ बकरी चहा'च्या संचालकांचं निधन, भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.