ETV Bharat / bharat

लखीमपूर हिंसाचाराच्या साक्षीदारावर गोळीबार; प्रियंका गांधीची योगी सरकारवर टीका - Priyanka Gandhi

लखीमपूर शेतकरी हत्याकांडात शेतकऱ्यांच्या न्यायाचा आवाज बनलेल्या लोकांवर गोळीबार करणारे हे कोण आहेत? ते कोणाच्या संरक्षणाखाली काम करत आहेत? 'बुलेटराज' निर्माण करणाऱ्या या लोकांवर भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्थेचा बुलडोझर फिरवणार का? असा प्रश्न उपस्थित करत भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलबाग सिंग यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा प्रियंका गांधी यांनी निषेध केला आहे.

लखीमपूर हिंसाचाराच्या साक्षीदारावर गोळीबार

author img

By

Published : Jun 1, 2022, 12:58 PM IST

लखनऊ - लखीमपूर खेरी हिंसाचाराचे महत्त्वाचे साक्षीदार आणि भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष दिलबाग सिंग यांच्यावर मंगळवारी रात्री हल्ला झाला. ( attack on the witness of Lakhimpur violence ) दिलबाग सिंग यांच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी अनेक राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दिलबागसिंग बाल-बाल बचावले आहेत. या घटनेवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

  • लखीमपुर किसान नरसंहार घटना में किसानों की न्याय की आवाज बने लोगों पर गोली चलाने वाले ये कौन लोग हैं?

    ये किसके सरंक्षण में काम कर रहे हैं?

    क्या भाजपा सरकार ‘बुलेटराज’ बनाने वाले इन लोगों पर कानून व्यवस्था का बुलडोजर चलाएगी? https://t.co/k0GMxrfGsl

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, लखीमपूर शेतकरी हत्याकांडात शेतकऱ्यांच्या न्यायाचा आवाज बनलेल्या लोकांवर गोळीबार करणारे हे कोण आहेत? ते कोणाच्या संरक्षणाखाली काम करत आहेत? 'बुलेटराज' निर्माण करणाऱ्या या लोकांवर भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्थेचा बुलडोझर फिरवणार का? असा घाणाघात त्यांनी केला आहे.

मंगळवारी रात्री गोला कोतवाली भागातील अलीगंज-मुडा रस्त्यावरून दिलबाग सिंग आपल्या घरी परतत असताना हा हल्ला झाला. मात्र, या हल्ल्यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीकेयू यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर केला, त्यामुळे त्यांना वाहन थांबवावे लागले. "त्यांनी गाडीचे दरवाजे आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला. ते अयशस्वी झाल्याने त्यांनी ड्रायव्हरच्या बाजूच्या खिडकीच्या चौकटीवर दोन गोळ्या झाडल्या, अस ते म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे, (3 ऑक्टोबर 2021)च्या टिकुनिया हिंसाचाराचा दिलबाग सिंग हा एक साक्षीदार आहे, ज्यामध्ये चार शेतकरी आणि एका पत्रकारासह आठ लोक मारले गेले होते. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Commercial LPG Cylinder: व्यावसायिक 'LPG'सिलिंडरच्या दरात 135 रुपयांची कपात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.