ETV Bharat / bharat

गोपनीयतेचे धोरण अपडेट नसेल तरी व्हॉट्सअपचे अकाउंट राहणार सुरू

व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने म्हटले, की नवे व्हॉट्सअपचे धोरण अपडेट नाही केले तरी वापरकर्त्यांचे अकाउंट १५ मे रोजीनंतर डिलीट होणार नाही. त्यामुळे धोरण (पॉलिसी) अपडेट न करणाऱ्या कोणत्याही भारतीयाचे अकाउंट बंद पडणार नाही.

व्हॉट्सअप
व्हॉट्सअप
author img

By

Published : May 7, 2021, 7:13 PM IST

नवी दिल्ली - व्हॉट्सअपने गोपनीयतेचे वादग्रस्त धोरण न स्वीकारलेल्या वापरकर्त्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. गोपनीयतेचे धोरण न स्वीकारणाऱ्या वापरकर्त्यांचे व्हॉट्सअप अकाउंट १५ मे रोजीनंतरही सुरू राहणार आहेत. यापूर्वी कंपनीचे धोरण स्वीकारले नाही, तर १५ मे रोजीनंतर अकाउंट बंद करणार असल्याचा इशारा दिला होता.

व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण जाहीर केल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी डाटा सुरक्षित राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुक व इन्स्टाग्रामकडे जाईल, असे अनेक वापरकर्त्यांना वाटत होते.

हेही वाचा-तामिळनाडू: एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्रिपदी विराजमान; सर्व रेशनकार्डधारकांना 2 हजारांची मदत

वापरकर्त्यांना धोरण अपडेटचे रिमाईंडर मिळत राहणार-

व्हॉट्सअपच्या प्रवक्त्याने म्हटले, की नवे व्हॉट्सअपचे धोरण अपडेट नाही केले तरी वापरकर्त्यांचे अकाउंट १५ मे रोजीनंतर डिलीट होणार नाही. त्यामुळे धोरण (पॉलिसी) अपडेट न करणाऱ्या कोणत्याही भारतीयाचे अकाउंट बंद पडणार नाही. मात्र, आम्ही पुढील काही आठवडे लोकांना धोरण अपडेट करण्याची आठवण (रिमाईंडर) देत राहणार आहोत, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे. बहुतांश वापरकर्त्यांनी नव्या अटी स्वीकरून व्हॉट्सअप धोरण अपडेट केले आहे. तर काही लोकांना धोरण अपडेट करण्याची संधी मिळाली नव्हती.

हेही वाचा-मोदी सरकारला लोकांबद्दल सहानुभूती नाही-सोनिया गांधींची टीका

मात्र, कोणत्या कारणांनी निर्णयात बदल केला, हे प्रवक्त्याने सांगितले नाही. तसेच व्हॉट्सअपचे नवीन धोरण स्वीकारणाऱ्या व्यक्तींची आकडेवारीही प्रवक्त्याने दिली नाही.

संबंधित बातमी वाचा-गोपनीयतेच्या अपडेटबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी तयार-व्हॉट्सअप

काय आहे व्हॉट्सअपच्या अपडेटचा वादग्रस्त मुद्दा?

केंद्र सरकारने व्हॉट्सअपला गोपनीयतेचे धोरण मागे घेण्याची सूचना केल्यानंतर कंपनीने भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावित गोपनीयेतच्या धोरणातून वापरकर्त्यांचा डाटा फेसबुकशी वापर करण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. त्या मुद्द्याबाबत असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी खुले असल्याचे कंपनीने म्हटले होते. व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार होते. मात्र, हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

व्हॉट्सअपने गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्याचे जाहीर केल्यावर भारतासह जगभरातून फेसबुक कंपनीवर टीका करण्यात आली होती. व्हॉट्सअपचा डाटा फेसबुकची मालकी असलेल्या इतर कंपन्यांकडे सामाई केला जाईल, अशी जगभरातील वापरकर्त्यांमध्ये भीती आहे. असे असले तरी व्हॉट्सअपवरील संदेश हे इन्ड-टू-इन्ड इन्क्रिप्टेड असल्याचे व्हॉट्सअपची मालकी असलेल्या फेसबुकने जाहीर केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.