ETV Bharat / bharat

Narendra Modi road show : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूमध्ये मेगा रोड शो, कार्यकर्त्यांची गर्दी

author img

By

Published : May 6, 2023, 7:21 AM IST

Updated : May 6, 2023, 8:08 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये मेगा रोड शो करणार आहेत. हा भव्य रोड शो 18 विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. हा रोड शो दोन भागात असणार आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधानांचा हा बंगळुरूमध्ये 26 कि.मी. मेगा रोड शो आहे.

Narendra Modi road show
Narendra Modi road show
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळुरूमध्ये मेगा रोड शो

बेंगळुरू : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सिलिकॉन सिटी बेंगळुरू येथे मेगा रोड शो झाला. ते भाजप उमेदवारांच्यासाठी त्यांना निवडूण देण्याचे आवाहन करत आहेत. अलीकडेच बेंगळुरू उत्तर मतदारसंघातील नाइस रोड जंक्शन ते सुमनहल्ली सर्कलपर्यंत पहिला रोड शो नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी आज बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुसरा रोड शो करत आहेत.

हात हलवत समर्थकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले : 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. याच अनुषंगाने पीएम मोदींनी शनिवारी २६ किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये भाग घेतला. बेंगळुरूमध्ये पीएम मोदींच्या या रोड शोमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यांचा २६.५ किमीचा रोड शो बेंगळुरूमधील बोम्मनहल्ली विधानसभा मतदारसंघातील कोनानकुंटे सोमेश्वरा सभा भवनापासून सुरू झाला आणि कडू मल्लेश्वर मंदिरात संपला. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या रोड शोमध्ये जवळपास संपूर्ण शहर भगवे झेंडे आणि कपड्यांनी झाकलेले दिसत होते. हा रोड शो 13 विधानसभा मतदारसंघातून गेला. रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या बॅरिकेड्सवर हात हलवत समर्थकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. रोड शो दरम्यान त्यांनी म्हैसूर पेटा परिधान केला होता. रोड शोसह विविध जंक्शनवर अनेक गट आणि कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर केले.

अॅम्ब्युलन्स जाममध्ये अडकली : यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यांच्यासोबत बेंगळुरूच्या दक्षिण खासदार तेजस्वी सूर्या आणि बेंगळुरू मध्यचे खासदार पीसी मोहन हे वाहनात होते. रोड शोमुळे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 34 रस्ते बंद ठेवण्यात आले होते. बंगळुरू पोलिसांनी पर्यायी रस्ता वापरण्याची विनंती केली. रोड शो दरम्यान अॅम्ब्युलन्स जाममध्ये अडकली होती. मोदींच्या रोड शोच्या मार्गावर पोहोचलेल्या दोन अॅम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकल्या. सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेड्स लावण्यात आल्याने रोड शो सुरू होईपर्यंत रुग्णवाहिका रस्त्यावरच उभी राहावी लागली. जयनगर मेट्रो स्थानकाजवळ दोन रुग्णवाहिका रस्त्याच्या मधोमध अडकली. मोदींच्या रोड शोसाठी लावलेल्या बॅरिकेडजवळ सायरन वाजवत १० मिनिटे अॅम्ब्युलन्स रस्त्यावर थांबली आणि ट्रॅफिक क्लिअरन्सची वाट पहावी लागली. तसेच, वाहतुकीतून पोलिसांनाही रुग्णवाहिका बाहेर काढता आली नाही.

हेही वाचा : Fake Currency Notes In Uttarakhand : सराईत दरोडेखोराला 22 लाखांच्या बनावट नोटांसह अटक

Last Updated : May 6, 2023, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.