अजमेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर आहेत. ते पुष्करला पोहोचले आहेत, जिथे पंतप्रधान मोदींनी ब्रह्मा मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर ते अजमेरला पोहोचले. त्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित करतेवेळी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस पक्ष रिमोटने चालणारा पक्ष असल्याचा घाणाघात त्यांनी केला आहे.
काँग्रेस हा 85 टक्के कमिशन मिळवणारा पक्ष : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही मान्य केले होते की जेव्हा काँग्रेस सरकार 100 पैसे जनतेला पाठवत असे, तेव्हा त्यातील 85 पैसे भ्रष्टाचारात जायचे. प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन मिळवणारा काँग्रेस पक्ष आहे. लूट करताना काँग्रेस भेदभाव करत नाही. काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाची समान लूट केली आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला आहे.
काँग्रेस असती तर लसीकरणासाठी 40 वर्षे : काँग्रेसचे सरकार असते तर, एक पिढी गॅस कनेक्शनशिवाय राहिली असती. काँग्रेसचे सरकार असते तर, लसीकरणासाठी 40 वर्षे लागली असती. 2014 पूर्वी अशी 18 कोटींहून अधिक कुटुंबे होती जिथे नळाची जोडनी नव्हती, पाईप कनेक्शन नव्हते. गेल्या 3 वर्षात भाजप सरकारने 9 कोटी लोकांना पीण्याच्या पाण्याचे कनेक्शन दिले आहे.
काँग्रेसने केला गरिबांचा विश्वासघात : काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी गरिबी हटवण्याची हमी दिली होती, मात्र, त्यांनीच गरिबांचा सर्वात मोठा विश्वासघात केला. गरिबांची दिशाभूल करणे, गरिबांना टात्कळत ठेवणे ही काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेसच्या या धोरणाचा फटका राजस्थानच्या जनतेलाही बसला आहे. राजस्थानमध्येही काँग्रेसमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला काँग्रेसने लुटले : देशातील प्रत्येक नागरिकाला समानपणे लुटण्याचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेस हा 85 टक्के भ्रष्टाचार असलेला पक्ष आहे. आज जगभरात भारताचे गुणगान गायले जात आहे. आज जगातील सर्वोच्च तज्ज्ञ सांगत आहेत की भारत गरिबी संपण्याच्या अगदी जवळ आहे. हा बदल कसा झाला? उत्तर आहे, सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास...
काँग्रेसने सैनिकांचा केला विश्वासघात : काँग्रेसने लष्करातील जवानांचीही फसवणूक केली आहे. काँग्रेस सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’च्या नावाखाली माजी सैनिकांचा विश्वासघात केला. त्यानंतर देशात भाजप सरकार स्थापन झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
हेही वाचा -