ETV Bharat / bharat

PM Gujarat Visit : PM मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर, 29 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Modi ) गुरुवारपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यात 29,000 कोटी ( Inauguration projects worth 29 thousand crores ) रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा, विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

Prime Minister Gujarat Visit
मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर
author img

By

Published : Sep 29, 2022, 10:11 AM IST

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Modi ) गुरुवारपासून सुरू होणाऱ्या त्यांच्या दोन दिवसीय गुजरात ( Prime Minister on Gujarat tour ) दौऱ्यात 29,000 कोटी ( Inauguration projects worth 29 thousand crores ) रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांमध्ये भावनगर येथील जगातील पहिले सीएनजी ( Compressed natural gas ) टर्मिनल, अहमदाबादमधील मेट्रो फेज-1, सुरतमधील डायमंड रिसर्च अँड मर्केंटाइल (ड्रीम) सिटीचा टप्पा-I यांचा समावेश आहे.

विविध योजनाचे उद्घाटन - या भेटीदरम्यान, पंतप्रधान 'गांधीनगर-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवतील. तसेच 36 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. जवळपास तीन दशकांपासून गुजरातमध्ये सत्ता गाजवणारा भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्ता टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

CNG टर्मिनलची पायाभरणी - तसेच मोदी सुरत शहरातील लिंबायत भागात एका सभेला संबोधित केल्यानंतर त्यांच्या यात्रेला सुरुवात करतील, असे, गुजरात सरकाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यादरम्यान ते 3 हजार 400 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करणार आहेत. सुरत नंतर भावनगरला पोहोचल्यानंतर पंतप्रधान सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील. ज्यात जगातील पहिल्या CNG टर्मिनल, 'ब्राऊनफील्ड पोर्ट'च्या पायाभरणीचा समावेश आहे.

पंतप्रधान रोड शो करणार - भावनगर शहरातील जवाहर चौक परिसरात दुपारी २ वाजता एका सभेला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान २ किमी लांबीचा रोड शो करतील. अहमदाबाद शहरातील मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता आयोजित एका भव्य समारंभात मोदी ३६व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनाची घोषणा करतील. अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानावर रात्री ९ वाजता गुजरात सरकारच्या नवरात्रोत्सवात मोदी उपस्थित राहणार आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसची सुरवात - पंतप्रधान शुक्रवारी गांधीनगर मुंबई सेंट्रल दरम्यानच्या पहिल्या 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला हिरवा झेंडा दाखवतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ते सकाळी 10.30 वाजता गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकावरून सेमी-हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. मोदी अहमदाबादमधील गांधीनगर ते कालुपूर स्थानकापर्यंत ट्रेनमधून प्रवास करणार आहेत. कालुपूर येथून 12 हजार 925 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या बहुप्रतिक्षित अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे ते उद्घाटन करतील.

अंबाजी मंदिरात करणार आरती - मोदी कालुपूर येथे मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करुन थलतेज येथील दूरदर्शन केंद्रात पोहोचतील, जिथे ते दुपारी 12 वाजता एका जाहीर सभेला संबोधित करतील. मोदी संध्याकाळी बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी शहरात पोहोचतील. तसेच 7 हजार 200 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करतील. त्यानंतर सभेला संबोधित केल्यानंतर ते प्रसिद्ध अंबाजी मंदिरात आरती करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.