रायगड: महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज दुपारी सव्वा बारा वाजता किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. किल्यासह पंधरा ते वीस किलोमीटर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. रायगडावर होळीचा माळरान येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मेघडंबरी,जगदीश्वर तसेच समाधी स्थळाला आकर्षित फुलांची सजावट तसेच रोषणाई ही करण्यात आलेली आहे. त्यांच्या सोबत राज्यपाल भगतसिह कोश्यारी, मंत्री नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. गेले तीन दिवस जिल्हा प्रशासन हे या दौऱ्याचे नियोजन करीत आहेत.
राष्ट्रपती दुपारी सव्वा बारा वाजता हेलिकॉप्टरने ते पाचाड येथे उतरणार आहेत. त्यानंतर किल्ले रायगडवर रोपवेने जाणार आहेत. महाडपासूनच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाचाड येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. येणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून तपासले जात असून पासधारकानाच आत सोडले जात आहे. ठिकठिकाणी असून चेक नाके उभारण्यात आले आहेत. नाते खिंडी ते रायगडमधील गावातील नागरिकांना आधारकार्ड पाहूनच प्रवेश दिला जात आहे. पाचाड येथील बाजारपेठ ही पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस दलाचे 3 हजार अधिकारी कर्मचारी तैनात आहेत. 1999 नंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती रायगडावर येत आहेत.
President Ramnath Kovind at Fort Raigad today: राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडावर - शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी (To greet Shivaji Maharaj) किल्ले रायगडावर (Fort Raigad). पोचत आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभुमीवर परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच किल्ला रोषणाई (Lighting) सह आकर्षक फुलांची सजवण्यात (decoration) आला आहे.