दरभंगा (बिहार) Pond Missing In Darbhanga : बिहारच्या दरभंगामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरभंगा जिल्ह्यात चक्क तलावच चोरीला गेलाय. हे प्रकरण शहरातील विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमधील नीम पोखरचं आहे. भूमाफियांनी गुपचूप मातीचा भराव करुन या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तिथं एक झोपडी आणि बांबूची भिंतही बांधलीय. प्रशासनाच्या संगनमतानं हा तलाव भरुन याठिकाणी घर बांधल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
- लोक काय म्हणतात? : स्थानिक रहिवासी सत्तोकुमार साहनी यांनी सांगितलं की, 10-15 वर्षांपूर्वी मच्छीमार समितीचे काही लोक या तलावात मत्स्यपालन करायचे. पण त्यानंतर काही कारणास्तव मत्स्यशेती झाली नाही. त्यामुळं तलाव कचरामय झाला. संपूर्ण तलाव दलदल बनला. सुमारे 6 महिन्यांपूर्वी एका व्यक्तीनं या तलावातील अर्धा हेक्टर जमीन भरली.
चहापत्ती व्यावसायिकाचा तलावावर दावा : दोन वर्षांपूर्वी काम सुरू असतानाही या तलावावर एका चहापान व्यावसायिकानं दावा ठोकला होता. त्यावेळी विद्यापीठ पोलीसांनी त्याला कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर त्या व्यक्तीनं कागदपत्रे सादर केली. पुढं हे प्रकरण न्यायालयात गेलं. मात्र समोरील पक्षकार न्यायालयात जमीन आपली असल्याचे सांगत आहे. आठ-नऊ दिवसांपूर्वी तलावात माती भरण्याचं काम झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनाला सुगावाही लागला नाही.
काय म्हणाले डीएम? : तलाव चोरीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर बिहारच्या प्रशासकीय विभागात खळबळ उडालीय. दरभंगाचे डीएम राजीव रोशन यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. पोखरशी संबंधित खटला अतिरिक्त उपजिल्हाधिकारी न्यायालयात सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या सर्कल अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ आपल्या न्यायालयात अपील दाखल करावं व घटनास्थळावरील सर्व कामांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी सूचना करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी राजीव रोशन यांनी सांगितलंय.
आतापर्यंत 200 तलाव नकाशावरुन गायब : दरभंगामधील तलावांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर दरभंगामध्ये जुन्या नोंदीनुसार संपूर्ण जिल्ह्यात 9 हजार 113 तलाव होते. यापैकी सरकारी कागदपत्रांनुसार एकट्या दरभंगा शहरात 350 ते 400 तलाव होते. मात्र भूमाफियांनी सरकारी यंत्रणेच्या मदतीनं तलाव ताब्यात घेऊन मातीनं भरण्यास सुरुवात केली. सध्या महापालिकेच्या नोंदीनुसार तलावांची संख्या फक्त 100 ते 125 वर पोहोचली आहे.
हेही वाचा :