नवी दिल्ली : द्वारका जिल्ह्यातील मोहन गार्डन पोलिस स्टेशन परिसरात बुधवारी सकाळी १२ वीच्या विद्यार्थ्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्याचा ( Acid attack ) तपास पोलिसांनी १२ तासांत लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी सचिन अरोरा, हर्षित अग्रवाल उर्फ हनी आणि वीरेंद्र सिंह उर्फ सोनू अशी त्यांची ओळख पटली आहे. सचिन आणि पीडित विद्यार्थिनीमध्ये पूर्वीपासून मैत्री होती. सप्टेंबरमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यामुळे विद्यार्थिनीने सचिनकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. याचा राग येऊन आरोपींनी हा प्रकार केला. (Acid attack on 12th class student in dwarka)
ई-कॉमर्स साइटवरून मागवले अॅसिड : आरोपीने विद्यार्थिनीवर अॅसिड टाकण्यासाठी ई-कॉमर्स साइटवरून अॅसिड मागवले होते, ज्याचे बिल त्याने पेटीएम खात्यातून भरले होते. पोलिसांनी घटनेत वापरलेला मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आणि आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तांत्रिक देखरेख आणि तपासानंतर पोलिसांनी काही वेळाने एका आरोपीला अटक केली. यानंतर सायंकाळी एक-एक करून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत सचिनने विद्यार्थिनीवर अॅसिड फेकण्याचा कट रचल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने ऑनलाइनवरून अॅसिड मागवले.
पोलिसांना फसवण्याचा होता प्लॅन : त्याने हर्षित आणि वीरेंद्र या मित्रांनाही गुन्ह्यात सहभागी करून घेतले. सचिनचा मोबाईल, त्याची स्कूटी आणि कपडे घालून वीरेंद्रला दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. असे केल्याने, घटनेच्या वेळी सचिनचे लोकेशन अन्यत्र कुठेतरी असल्याचे पोलिसांना वाटेल. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरही सचिनच्या कपड्यांबाबतही तेच दिसत आहे.तर सचिनने सांगितले की, तो वारंवार विद्यार्थिनीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. याचा राग येऊन त्याने विद्यार्थिनी अॅसिड ओतण्याचा कट रचला. तिन्ही आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.