नवी दिल्ली: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2.17 कोटींहून अधिक पात्र लाभार्थ्यांना 9420.58 कोटी रुपयांचा (केंद्र आणि राज्याच्या हिश्श्यासह) मातृत्व लाभ वितरित केला आहे. PMMVY अंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची संख्या, मातृत्व लाभांच्या लाभार्थ्यांची संख्या आणि वितरित केलेल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशानुसार तपशील सरकारने आता दिला आहे.
PMMVY अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 हजारांच्या मातृत्व लाभाचे वितरण कोविड-19 महामारीच्या कालावधीसह योजना सुरू झाल्यापासून सुरू आहे. पात्र लाभार्थींना रोख प्रोत्साहन थेट त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) मोडमध्ये तीन हप्त्यांमध्ये मिळते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासाठीचा निधी हा लाभार्थ्यांच्या संख्येवर केंद्र सरकारकडून दिला जातो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत मंजूर केलेल्या निधीचा वर्षवार आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील आणि ईशान्य क्षेत्रासह अहवाल दिलेल्या वापराचा तपशील केंद्र सरकारने तयार केला आहे.
PMMVY च्या यशस्वी अंमलबजावणीचा वेळोवेळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स, बैठका आणि कार्यशाळांद्वारे आढावा घेतला जातो. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राज्यांना येणाऱ्या कार्यात्मक अडचणींचा अहवाल देण्यात आला आहे. ज्या तांत्रिक चर्चा आणि हाताळणीद्वारे दूर केल्या जातात. योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पर्धा निर्माण करण्यासाठी मंत्रालय दरवर्षी मातृ वंदना सप्ताह साजरा करते. ही माहिती देताना, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सांगितले की, राज्ये आणि केंद्रामध्ये PMMVY च्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रभातफेरी, पथनाट्य, वृत्तपत्रातील जाहिराती, रेडिओ जिंगल्स, सेल्फी यासारखे विविध वर्तन बदल संप्रेषण (BCC) उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
गर्भवती महिलांना ६ हजारांची मदत: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत, सरकार गरोदर महिलांना तीन टप्प्यांत 6,000 रुपयांची आर्थिक मदत पुरवते. या योजनेत पहिल्या टप्प्यात 1 हजार, दुसऱ्या टप्प्यात 2 हजार, तिसऱ्या टप्प्यात 2 हजार आणि बाळाच्या जन्माच्या वेळी 1 हजार रुपये दिले जातात. ज्यांचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्या महिलांना या योजनेचा फायदा घेता येतो. सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या महिलांना मातृ वंदना योजनेचा लाभ घेता येत नाही.