ETV Bharat / bharat

Atal Bihari Vajpayee Death Anniversary : अटलजींच्या नेतृत्वामुळे भारत सक्षम झाला; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांची अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली

author img

By

Published : Aug 16, 2023, 10:17 AM IST

Updated : Aug 16, 2023, 12:59 PM IST

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना वाजपेयी यांच्या नेतृत्वाचा देशाला मोठा फायदा झाल्याचे भावोद्गार काढले.

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांची अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली

नवी दिल्ली : पंतप्रधानपदावर असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळेच भारताचा विकास झपाट्याने झाला. 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य मोलाचे असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी वाहिली आदरांजली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'सदैव अटल' या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती, ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  • #WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at 'Sadaiv Atal' memorial to pay tribute to former PM Atal Bihari Vajpayee on his death anniversary

    Union Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh and other BJP leaders also represent pic.twitter.com/biwfZQNhMZ

    — ANI (@ANI) August 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अटलबिहारी वाजपेयी यशस्वी पंतप्रधान : दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे पहिले काँग्रेसेतर पक्षाचे पहिले 'यशस्वी पंतप्रधान' म्हणून गणले जातात. 1996 मध्ये भाजपाला 162 जागा मिळाल्या होत्या. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रादेशीक पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र केवळ 13 दिवस हे सरकार तग धरू शकले. त्यानंतर दुसऱ्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांनी 16 मे 1996 ला पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली. त्यांचा हा कार्यकालही 13 महिन्यांचा ठरला. 1 जून 1996 ला त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपाने दणदणीत यश मिळवले. 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या आपल्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत त्यांनी अनेक विकासकामे केली. अटलबिहारी वाजपेयी यांनी मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केले आहे.

ग्वालियरला झाला होता जन्म, तर दिल्लीत घेतला अखेरचा श्वास : अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म ग्वालियरला 25 डिसेंबर 1924 ला झाला होता. त्यांनी भारतीय जनसंघातून आपल्या राजकीय कार्याचा ठसा उमटवला होता. भारतीय जनसंघाचे काही काळ ते अध्यक्षही होते. विशेष म्हणजे राजकारणी असूनही अटलबिहारी वाजपेयी हे हिंदीचे सुप्रसिद्ध कवी होते. एक कवी म्हणून त्यांनी देशभरात आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अनेक कविता सुप्रसिद्ध आहेत. मात्र 16 ऑगस्ट 2018 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूपश्चात त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Last Updated : Aug 16, 2023, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.