नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानातील सीकर येथील कार्यक्रमातून जारी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील सीकर येथे आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमातून हा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 17 हजार कोटी रुपये डीबीटी प्रणालीने हस्तांतरित होणार आहेत. याचा फायदा देशातील 8.5 कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना होणार आहे.
11 कोटी शेतकऱ्यांना लाभ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. आतापर्यंत या योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीने वाटप करण्यात आले आहेत. ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. ही रक्कम दर वर्षी 6 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. म्हणजेच दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात. आतापर्यंत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकर्यांना 2.42 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे.
-
#WATCH | Rajasthan: Prime Minister Narendra Modi says, "CM Ashok Gehlot has been ill for some time now & has injured his leg. He was supposed to attend the program today, but could not due to his health conditions. I pray for his good health..." pic.twitter.com/T46ke7wNmb
— ANI (@ANI) July 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Rajasthan: Prime Minister Narendra Modi says, "CM Ashok Gehlot has been ill for some time now & has injured his leg. He was supposed to attend the program today, but could not due to his health conditions. I pray for his good health..." pic.twitter.com/T46ke7wNmb
— ANI (@ANI) July 27, 2023#WATCH | Rajasthan: Prime Minister Narendra Modi says, "CM Ashok Gehlot has been ill for some time now & has injured his leg. He was supposed to attend the program today, but could not due to his health conditions. I pray for his good health..." pic.twitter.com/T46ke7wNmb
— ANI (@ANI) July 27, 2023
कसा मिळतो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केआयसी आणि जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी करुन जमीन पडताळणी करणे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ई केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. शेतकरी ई केवायसी करण्यासाठी थेट पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयातही करू शकता.
पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्र उघडणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. ही रक्कम शेतकरी शेतीशी संबंधित कामांसाठी वापरतात. राजस्थानमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1.25 लाख पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्र (PMKSK) देशाला समर्पित करणार आहेत. सरकार देशातील किरकोळ खतांची दुकाने टप्प्याटप्प्याने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्रात रूपांतरित करत आहे. ही केंद्रे शेतकऱ्यांना कृषी कच्चा माल, माती परीक्षण, बियाणे आणि खते पुरवणार असल्याची माहितीही जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा -