ETV Bharat / bharat

Narendra Modi France Visit : आता आयफेल टॉवरवरुन देता येणार रुपयात बील; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनिवासी भारतीयांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये अनिवासी भारतीयांसोबत गुरुवारी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी आता भारतीय नागरिकांना आयफेल टॉवरवर यूपीआयने बील अदा करता येईल, असेही स्पष्ट केले.

Narendra Modi France Visit
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 14, 2023, 12:14 PM IST

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या भेटीत अनिवासी भारतीयांची भेट घेऊन त्यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. भारतातील आगामी पिढ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संकल्प घेऊन मी फ्रान्समध्ये आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माझे संपूर्ण शरीर आणि वेळ देशवासियांसाठी अर्पण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीयांना आता आयफेल टॉवरवरुन रुपयात बील अदा करता, असेही स्पष्ट केले. पॅरिसमधील ला सीन म्युझिकलमध्ये अनिवासी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. आजचा भारत आपल्या वर्तमान आव्हानांवर कायमस्वरूपी उपाय शोधत आहे. देशाचे भविष्य घडविण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

माझ्या शरीराचा प्रत्येक कण देशवासियांसाठी : अनिवासी भारतीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि काळाचा प्रत्येक क्षण फक्त तुम्हा लोकांसाठी आहे. भारत मोठ्या बदलाचा साक्षीदार आहे. त्याची कमान नागरिकांच्या हातात असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. जगातील रिअल टाइम डिजिटल व्यवहारांपैकी 46 टक्के व्यवहार भारतात होत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यांनी नागरिकांना रोख रक्कम न बाळगता भारतात यावे आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इन्स्टंट पेमेंट सिस्टमद्वारे सर्व पेमेंट करावे, असे आवाहनही केले आहे.

देशात मोठा सामाजिक बदल घडवून आणला : भारताचे UPI असो किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्म देशात मोठा सामाजिक बदल घडवून आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. भारत आणि फ्रान्सही या दिशेने एकत्र काम करत असल्याने याचा आनंद असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेली सांगितले. भारत आणि फ्रान्सने UPI वापरण्यास सहमती दर्शविली आहे. करारानंतर मी निघून जाईन, मात्र पुढे जाणे हे तुमचे काम आहे. येत्या काही दिवसात त्याची सुरुवात आयफेल टॉवरपासून केली जाईल. म्हणजेच आता भारतीय पर्यटक आयफेल टॉवरवर UPI द्वारे रुपयात पैसे देऊ शकतील, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे निमंत्रण : भारत ही लोकशाहीची जननी असून विविधतेचे मॉडेल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी अनिवासी भारतीयांना भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे आवाहनही केले. जग एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. भारताची क्षमता आणि भूमिका झपाट्याने बदलत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या भारत G 20 गटाचा अध्यक्ष आहे. एका देशाच्या अध्यक्षतेखाली देशभरात 200 बैठका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संत थिरुवल्लुवर यांचा पुतळा फ्रान्समध्ये बसवण्यात येणार असल्याचे सांगून पंतप्रधान मोदींनी हा भारतासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Narendra Modi Called LG Saxena : दिल्लीच्या पुराची पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिंता, फ्रान्समधून फोन करुन नायब राज्यपालांकडून घेतला आढावा
  2. Pm Modi Conferred Frances Highest Award : पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान; इमॅन्युएल मॅक्रॉनने नरेंद्र मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने केले सन्मानित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.