ETV Bharat / bharat

PM Narendra Modi on Dynasty : 2024 पर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घराणेशाही संपविणार - पंतप्रधान मोदी - PM Modi on the Kashmir Files

दिल्लीतील आंबेडकर भवनात झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत ( BJP Parliamentary Party meeting ) पंतप्रधान मोदींनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की घराणेशाहीचे पक्ष देशाला पोकळ करत आहेत. आम्ही घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध ( PM Modi attacked on dynasty politics ) लढतो आहोत. त्यामुळे जनता भाजपच्या विचारांवर शिक्कामोर्तब करते.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Mar 15, 2022, 5:07 PM IST

Updated : Mar 15, 2022, 5:25 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपच्या कोणत्याही नेत्या, खासदार किंवा मंत्र्याच्या मुलाचे किंवा मुलीचे तिकीट कापले गेले तर त्याला मी जबाबदार आहे.

दिल्लीतील आंबेडकर भवनात झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत ( BJP Parliamentary Party meeting ) पंतप्रधान मोदींनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की घराणेशाहीचे पक्ष देशाला पोकळ करत आहेत. आम्ही घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध ( PM Modi attacked on dynasty politics ) लढतो आहोत. त्यामुळे जनता भाजपच्या विचारांवर शिक्कामोर्तब करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार

हेही वाचा-Encounter In Pulwama : दक्षिण काश्मीरमध्ये चकमक; एका अज्ञात दहशतदी ठार केल्याचा पोलिसांचा दावा

2024 पर्यंत घराणेशाही संपवायची आहे

पक्षात घराणेशाहीचे राजकारण होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर पक्षांच्या घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्धचा लढा सुरूच राहणार आहे. 2024 पर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घराणेशाही संपवायची आहे, अशी प्रतिज्ञा आपल्याला करायची आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. कुठे पराभव झाला आहे, त्याचाही आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले. भाजप खासदारांच्या पराभवाच्या कारणांचा अहवाल ( PM Modi in BJP Parliamentary Party meeting ) तयार करण्यात येणार आहे. त्याआधारे पुढील रणनीती आखली जाईल.

हेही वाचा-Newborn Baby Pushpa Style : जन्मताच बाळाने मारली पुष्पाची स्टाईल; 'झुगेंगा नही साला', पाहा व्हिडिओ

'द काश्मीर फाइल्स'चा पंतप्रधानांनी केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान 'द काश्मीर फाइल्स' या ( PM Modi on the Kashmir Files ) चित्रपटाचाही उल्लेख केला. दडपण्यात आलेले सत्य चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत सरकार करत असलेल्या कामाची माहिती दिली.

दडपण्यात आलेले सत्य चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न

हेही वाचा-Goa Cm : गोवा रणसंग्राम; प्रमोद सावंत की विश्वजित राणे, कोण कोणार गोव्याचे मुख्यमंत्री?

चार राज्यांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षाकडून निरीक्षकही निश्चित करण्यात आले. यावेळी पक्षाने केंद्रातील बड्या नेत्यांवर चार राज्यांत सरकार स्थापण्याची जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उत्तर प्रदेशचे केंद्रीय निरीक्षक बनवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत सह-पर्यवेक्षक रघुवर दास असणार आहेत. राजनाथ सिंह यांना उत्तराखंडचे मुख्य निरीक्षक आणि मीनाक्षी लेखी यांना सहनिरीक्षक बनवण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मणिपूरसाठी केंद्रीय निरीक्षक असणार आहेत. त्यांच्यासोबत किरेन रिजिजू यांना सह-पर्यवेक्षक बनवण्यात आले आहे. गोव्यात सरकार स्थापनेची जबाबदारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Last Updated : Mar 15, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.