ETV Bharat / bharat

PM Narendra Modi: भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय सुरू होत आहे- पंतप्रधान मोदी - अमृत भारत स्टेशन योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे दूरस्थप्रणालीतून भूमीपूजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. अमृत ​​भारत स्टेशन योजनेअंतर्गत 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 6, 2023, 7:46 AM IST

Updated : Aug 6, 2023, 1:31 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यावर पंतप्रधानांनी अनेकदा भर दिला आहे. देशभरातील लोकांसाठी रेल्वे हे वाहतुकीचे पसंतीचे साधन असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मोदी रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यावर भर देत आहेत. त्या अनुषंगाने अमृत भारत स्टेशन योजना देशभरातील 1309 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी राबविण्यात येणार आहे. विकासाच्या ध्येयाकडे वाटचाल करणारा भारत आता सुवर्णकाळाच्या सुरुवातीला आहे. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवे संकल्प आहेत. या प्रकाशात, आज भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू होत आहे, असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • हमने देश के विकास को नकारात्मक राजनीति से ऊपर उठकर एक मिशन के रूप में लिया है। किस राज्य में किसकी सरकार है, कहां किसका वोट बैंक है, इन सबसे ऊपर उठकर हम पूरे देश में विकास को सर्वोच्च प्राथमिकता दे रहे हैं। pic.twitter.com/ZFCpVlaLnB

    — Narendra Modi (@narendramodi) August 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रेल्वे स्थानके 'सिटी सेंटर' म्हणून विकसित करणार : अमृत योजनेचा एक भाग म्हणून, आज 508 स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. या स्थानकांचा 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून पुनर्विकास केला जाणार आहे. शहराच्या दोन्ही बाजूंना योग्य प्रकारे जोडून ही स्थानके ‘सिटी सेंटर’ म्हणून विकसित करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येत आहे. हा एकात्मिक दृष्टीकोन रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित करून शहराच्या सर्वांगीण नागरी विकासाच्या दृष्टीकोनातून प्रेरित आहे. यामध्ये स्थानकांचा पुनर्विकास, सुव्यवस्थित रहदारी, आंतर-मॉडल एकत्रीकरण आणि प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी सु-डिझाइन केलेले चिन्ह, तसेच प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा सुनिश्चित करेल. स्थानक इमारतींचे डिझाइन हे स्थानिक संस्कृती, वारसा आणि वास्तुकला यांच्याशी संलग्न असणार आहे.

देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 508 स्थानके : 508 स्थानके देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. यात उत्तर प्रदेशातील 55 स्थानके, राजस्थानमधील 55 स्थानके, बिहारमधील 49 स्थानके, महाराष्ट्रातील 44 स्थानके, पश्चिम बंगालमधील 37 स्थानके आहेत. मध्य प्रदेशातील 32 स्थानके, आसाममधील 32 स्थानके, ओडिशामधील 25 स्थानके, पंजाबमधील 22 स्थानके, गुजरातमधील 21 स्थानके, तेलंगणामधील 21 स्थानके, झारखंडमधील 20 स्थानके, आंध्र प्रदेशमधील18 स्थानके, तामिळनाडूमधील 18 स्थानके, हरियाणामधील 15 स्थानके, कर्नाटकमधीलल 13 स्थानकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, 'असे' आहे दिवसभरातील वेळापत्रक
  2. PM Modi Pune Visit: केंद्र सरकारकडून वेळोवेळी निधी मिळत असल्याने राज्याचा विकास-एकनाथ शिंदे
  3. PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Last Updated : Aug 6, 2023, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.