ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी हनुमान, तर कोरोनाची लस म्हणजे संजीवनी ; भाजपा नेते अश्विनी कुमार चौबे यांनी उधळली स्तुतीसुमने

नरेंद्र मोदी हनुमानाप्रमाणे आपल्यासाठी कोरोना लसीच्या रुपात संजीवनी बुटी घेऊन आले आहेत, असे चौबे म्हणाले. उत्तर प्रदेशच्या महादेव मंदिराचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

नरेंद्र मोदी-चौबे
नरेंद्र मोदी-चौबे
author img

By

Published : Mar 13, 2021, 10:41 AM IST

हाथरस - केंद्रीय राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांची तुलना देव-देवतांशी केली आहे. नरेंद्र मोदी हनुमानाप्रमाणे आपल्यासाठी कोरोना लसीच्या रुपात संजीवनी बुटी घेऊन आले आहेत, असे चौबे म्हणाले. उत्तर प्रदेशच्या महादेव मंदिराचे लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतूक झाले आहे. देव हनुमान यांच्या आशिर्वादामुळे आणि वैज्ञानिकांच्या संशोधनामुळे कोरोना लस तयार करणे शक्य झाले, असेही ते म्हणाले.

भाजपा नेते अश्विनी कुमार चौबे यांनी मोदींवर उधळली स्तुतीसुमने

समर्पणाची भावना आणि गरिबांची मदत करण्याचा सेव भाव पंतप्रधान मोदींमध्ये आहे. सर्वांचा सन्मान, सर्वांची साथ ,सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास या सुत्रानुसार मोदी देशाचा विकास करत आहेत, असे ते म्हणाले. याचबरोबर चौबे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे राज्यातील उत्तम आरोग्य व्यवस्थेबाबत कौतूक केले. योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ज्याप्रकारे कार्य केले. ते अत्यंत कौतूकास्पद आहे, असे चौबे म्हणाले.

मोदींची देव-देवतांशी तुलना -

यापूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना रामाशी तर अमित शाह यांची तुलना हनुमानाशी केली होती. जर नरेंद्र मोदी भगवान राम असतील तर अमित शाह हे भगवान हनुमान आहेत, असे ते म्हणाले होते. भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नरेंद्र मोदी यांना विष्णूचा ११ वा अवतार असे संबोधले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.