जैसलमेर - पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमध्ये जाऊन उत्सव साजरे करतात. आज, दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-पाक सीमेवर जैसलमेरला दाखल झाले आहेत. पंतप्रधान सीमेवर तैनात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतील.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्र्यांसमवेत संरक्षण प्रमुख बिपिन रावत, लष्करप्रमुख एमएम नरवणे, बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थाना हे असतील. लोंगेवाला भागात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथेच पंतप्रधान मोदी जवानांसह दिवाळी साजरी करतील. सैनिकांची दिवाळी साजरी केल्यानंतर मोदी दुपारी 12 नंतर जैसलमेरहून दिल्लीला रवाना होतील.
विमानतळ कॅम्पसमध्येच सैनिकांना संबोधित करतील -
पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने जैसलमेरमधील हवाई दल विमानतळावर पोहोचले आहेत. हवाई दलातील अधिकारी आणि सैनिक यांच्यासमवेत ते दिवाळी साजरी करतील. तसेच विमानतळ कॅम्पसमध्येच ते सैनिकांना संबोधित करतील.
1971 च्या युद्धातील अदम्य धाडसाचे प्रतीक -
यानंतर नरेंद्र मोदी 1971 च्या युद्धातील अदम्य धाडसाचे प्रतीक मानल्या जाणार्या लोंगेवाला पोस्ट येथे जातील. त्याठिकाणी रात्री 9 वाजता ते बीएसएफ जवानांसह दिवाळी साजरी करतील. तसेच सैनिकांना प्रोत्साहित करतील.
महत्त्वाचे म्हणजे, 1971 च्या लोंगेवाला चौकी येथे भारत-पाक युद्धाच्या वेळी कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वात 120 भारतीय सैनिकांनी सामर्थ्य दाखवले होते. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या संपूर्ण इन्फंट्री ब्रिगेड आणि टी-59 रेजीमेंटला धूळ चारली होती.
हेही वाचा- पाक सीमेवर धुमश्चक्री: नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या भूषण यांना वीरमरण