नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून ( PM Modi Address Nation in Mann Ki Baat ) देशवासियांशी संवाद साधला. या मालिकेचा हा 84 आणि या वर्षातील शेवटचा भाग आहे. पंतप्रधान मोदी यांनी तामिळनाडू कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमात मोदींनी कोरोना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लसीकरणावर भाष्य ( PM Modi in Mann Ki Baat ) केले.
'मन की बात' मधील महत्त्वाचे मुद्दे -
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा आपल्याला स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जाग्या करण्याची संधी देत आहे. देशासाठी नवे संकल्प करण्याची, काही तरी करण्याची इच्छाशक्ती दाखविण्याची हे प्रेरणादायी वेळ आहे. स्वातंत्र्यसंग्रामातल्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेत देशासाठी काम करत राहूया. आपला भारत देश हा असामान्य प्रतिभांची खाण आहे, असे मोदी म्हणाले.
एकमेंकाची साथ निभावत भारताने मोठ्या महामारीचा सामना केला आहे. वर्ष 2020 संपले असून वर्ष 2022 येत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व जण करत असून मनात काहीतरी संकल्प करत आहेत.
देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार होत आहे. यावर आपले शास्त्रज्ञ काम करत आहेत. पण, प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, कोरोना नियमांचे पालन करावे आणि स्वत:ला शिस्त लावावी.
'मन की बात' कार्यक्रमात मोदींनी पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर भाष्य केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केल्याचे मोदींनी सांगितले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातला अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झाला असला तरी तो तयार करण्याला प्रारंभ तर 100 वर्षांपूर्वी झाला होता, असे मोदींनी सांगितले.
पर्यावरण मंत्रालयानं आपल्याकडे मोकळ्या झालेल्या जंकयार्डच्या जागेचं वेलनेस केंद्रामध्ये रूपांतर केल्याचे मोदींनी सांगितले. शहरी कार्य मंत्रालयानं एक स्वच्छ एटीएमही लावले आहे. लोकांनी कचरा द्यावा आणि त्या बदल्यात रोख रक्कम घेवून जावी, असा त्याचा उद्देश असल्याचे मोदी म्हणाले.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विभागांनी झाडांची पडणारी सुकलेली पाने आणि जैविक कचरा यांचं जैविक खत बनवण्यास प्रारंभ केला आहे. या विभागांनी वाया जाणाऱ्या कागदांपासून लागणारी स्टेशनरीही बनवण्याचं काम सुरू केल्याचे मोदींनी आजच्या 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले. नव्याने सुरवात करताना स्वतःचे सामर्थ्य ओळखण्याची एक संधी आपल्याला मिळत असते. त्यामुळे विद्यार्जन करण्यासाठी प्रत्येकाने क्षणाक्षणाचा उपयोग केला पाहिजे, असे मोदींनी भाषण संपवताना म्हटलं.
हेही वाचा - PM Narendra Modi : 15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा