ETV Bharat / bharat

आसाम-मिझोरम वाद; पंतप्रधान मोदींनी आसामच्या खासदारांची घेतली भेट - मिझोरम आसाम सीमावाद

मिझोरमचे राज्यपाल हरीबाबू कामभमपती मिझोरम- आसाममधील सीमावादाची स्थिती आणि दोन्ही राज्यांतील तणाव निवळ्याकरिता दोन्ही राज्यांची पंतप्रधानांसमवेत बैठक झाल्याचे सुत्राने सांगितले. हरीबाबू कामभमपती हे सोमवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 2, 2021, 3:21 PM IST

नवी दिल्ली - आसाम आणि मिझोरमध्ये सीमावाद शमण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या खासदारांची सोमवारी बैठक घेतली आहे. त्यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल हरीबाबू कामभमपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

मिझोरमचे राज्यपाल हरीबाबू कामभमपती मिझोरम- आसाममधील सीमावादाची स्थिती आणि दोन्ही राज्यांतील तणाव निवळ्याकरिता दोन्ही राज्यांची पंतप्रधानांसमवेत बैठक झाल्याचे सुत्राने सांगितले.

हरीबाबू कामभमपती हे सोमवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिश्व सर्मा यांनी राज्यसभेचे खासदार के. वनलॅव्हेने यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्याचे राज्य पोलिसांना निर्देश दिले आहेत. मात्र, इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे कायम राहणार असल्याचे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी दोन्ही राज्यांमधील वादावर एकमताने तोडगा काढण्याचे वक्तव्य माध्यमातून वाचल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिश्व शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटले. आसामला नेहमीच ईशान्येचा उत्साह कायम ठेवायचा आहे. दोन्ही राज्यांच्या सीमामध्ये शांतता ठेवम्यासाठी आम्ही वचननबद्ध आहोत.

हेही वाचा-सिक्किम सेक्टरमध्ये भारत-चीन लष्करादरम्यान हॉटलाइन स्थापित

काय घडली आहे घटना-

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवसांनी सोमवारी वादग्रस्त आसाम-मिझोरम सीमेवर पुन्हा हिंसाचार भडकला. आसाममधील कछार जिल्हा आणि मिझोरम कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 6 जवान ठार झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा ट्विटरवार (Twitter) पाहायला मिळाला. विशेष म्हणजे दोघांनीही अमित शहा यांना आपापल्या ट्विट पोस्टमध्ये टॅग केले होते. दोन्ही राज्यांनी सीमावादावर शांतीने मार्ग काढण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आवाहन केले होते.

हेही वाचा-जम्मू-काश्मीर : दगडफेक करणाऱ्यांसाठी कठोर नियम; सरकारी नोकरी आणि पासपोर्ट मिळणार नाही

सीमावादात मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची आसाम सरकारने घोषणा केली आहे. तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाणार आहे. सरकारने जखमी पोलीस अधिक्षकांना उपचारासाठी मुंबईला पाठविले आहे.

हेही वाचा-सागर धनकर हत्या प्रकरण: दिल्ली पोलीस आज करणार पहिले आरोपपत्र दाखल, सुशिल कुमारसह आहेत 12 आरोपींची नावे

मिझोरमच्या पोलिसांकडून आसामच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल-

मिझोरम-आसाममधील सीमावादाला नवीन वळण लागले आहे. मिझोरमच्या पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिंमत विश्व सर्मा, चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिझोरमच्या कोलासिब जिल्ह्यात हिंसाचार झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.