नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत, असं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आपल्या भाषणादरम्या म्हणाले. दिल्लीतील महरौलीमध्ये त्यांनी शेतकरी संवाद अभियानाला संबोधीत केले. तसेच यावेळी त्यांनी कृषी कायद्यांवरून विरोधकांवर टीका केली. एमएसपीवरून विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे शाह म्हणाले.
एमएसपी व्यवस्था कायम राहणार आहे. तीन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. एमएसपी व्यवस्था कोणीच मोडीत काढू शकत नाही. तसेच त्यांची जमीनही कोणीच हिसकावून घेणार नाही. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहे. विरोधकांच्या अफवाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे गृह मंत्री म्हणाले.
पैसे थेट शेतकऱयांच्या खात्यामध्ये -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत मोदींनी आज 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये 18 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. हे पैसे थेट शेतकऱयांच्या खात्यामध्ये पोहचले आहेत, असे शाह यांनी सांगितले.
आज दोन महान नेत्यांची जयंती -
युपीए सरकराच्या काळात कृषीसाठी अर्थसंकल्पात 21,900 कोटी रुपयांचे बजेट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते वाढवून 1,34,399 कोटी केले आहे. आजचा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडीत मदन मोहन मालवीय यांची जयंती आहे, असे शाह म्हणाले.
हेही वाचा - आज अटल बिहारी वाजपेयींची ९६वी जयंती; पंतप्रधान मोदी करणार विशेष पुस्तकाचे प्रकाशन..