नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतला. येत्या 17 महिन्यांत 10 लाख जणांची भरती ( central govt recruitment 10 lakh people ) करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या ( PM Narendra Modi ) आहेत.
पीएमओचे ट्विट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले. पीएमओने ही माहिती दिली आहे.
प्रत्यक्षात बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय आला आहे. विविध सरकारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्यात आलेली नाही, असे आहेत. पीएमओने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश दिले.'
हेही वाचा : Live Updates : डॉग स्कॉडही जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासमोर नतमस्तक