नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील आव्हानांवर उच्चस्तरीय बैठक मंगळवारी घेतली आहे. या बैठकीला राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवाल हे उपस्थित राहिल्याचे सूत्राने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत संरक्षण क्षेत्रामधील भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. तसेच अत्याधुनिक यंत्रणेची सुसज्जता, तरुणांचा अधिक सहभाग, स्टार्टअप्स आदी मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये रविवारी सकाळी एअर फोर्स स्टेशनवर दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे दोन स्फोट घडविण्यात आल्यानंतर ही बैठक झाली आहे.
हेही वाचा-मुलाकडून ऑनलाईन गेम खेळताना एक चूक; शिक्षिकिने गमाविले तीन लाख रुपये
ड्रोनद्वारे दहशतवाद्यांचा देशात पहिला हल्ला
जम्मू विमानतळावर पाच मिनिटांच्या अंतराने रविवारी दोन स्फोट झाले. एक स्फोट हा तांत्रिक विभागात तर दुसरा मोकळ्या जागेत झाल्याची माहिती आहे. जम्मू हवाई तळाजवळ स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे. ड्रोनद्वारे दहशतवाद्यांनी केलेला देशातील हा पहिलाच हल्ला आहे. याबाबतचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला आहे.
हेही वाचा-गावातील महिलेवर अत्याचार; बार्शीच्या खांडवी ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईची दोवाल यांची शांघाय संस्थेत मागणी
भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात २४ जूनच्या शांघाय सहकार्य संस्थेच्या (एससीओ) बैठकीत कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्यासाढी जागतिक कृती कार्यक्रम निश्चित करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एससीओ बैठकीत ठेवला आहे. दहशतवादी हे तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. दुसरीकडे डार्क, वेब, कृत्रिम मानवी बुद्धिमता आणि सोशल मीडियाचा गैरवापर करतात. त्यामुळे त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज असल्याचे दोवाल यांनी म्हटले आहे.