नवी दिल्ली : PIL Against Carrying Saber: शीख प्रवाशांना देशांतर्गत विमानांमध्ये कृपाण घेऊन जाण्याची परवानगी Sikhs carrying sabers during flight देण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा Chief Justice Satish Chandra Sharma आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने वकील हर्ष विभोर सिंघल यांची याचिका फेटाळून लावत गुरुवारी हा निकाल दिला. PIL seeking ban on Sikhs from carrying saber
नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या (DGCA) 4 मार्च 2022 च्या अधिसूचनेनुसार शीख समुदायाच्या सदस्यांना नागरी उड्डाणांमध्ये किरपाण बाळगण्याची परवानगी दिली होती. अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, शीखांना कृपाण बाळगण्याची परवानगी असेल, जर त्याच्या ब्लेडची लांबी सहा इंचांपेक्षा जास्त नसेल आणि त्याची एकूण लांबी नऊ इंचांपेक्षा जास्त नसेल. नंतर एक शुद्धीपत्र जारी करण्यात आले, ज्यात विमानतळांवर काम करणाऱ्या शीखांनाही कृपाण बाळगण्याची परवानगी देण्यात आली.
सिंघल यांनी आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला की, नागरी विमानात कृपाण नेण्यामुळे विमान वाहतूक सुरक्षेसाठी धोकादायक परिणाम होतात आणि विमानांचे अपहरण करण्यासाठी शस्त्र म्हणून त्यांचा वापर केल्याची उदाहरणे यापूर्वीही घडली आहेत.
याचिकेत 1981 आणि 1984 ची उदाहरणे दिली आहेत, जेव्हा अशा प्रकारचे अपहरण केले गेले आणि अतिरेक्यांनी सरकारच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली. देशातील शीखांना त्यांच्या धार्मिक नियमांनुसार कृपाण घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत शीख समुदायाला ही सूट दिली आहे.