नवी दिल्ली : देशाच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाक्युद्ध सुरू आहे. अशातच उद्घाटनाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मोदी सरकारकडून करण्यात येणाऱ्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर 19 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात संसद भवनाच्या उद्घाटनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
-
PIL filed in Supreme Court seeking a direction that the #NewParliamentBuilding should be inaugurated by the President of India. pic.twitter.com/IG8y4gQn4i
— ANI (@ANI) May 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PIL filed in Supreme Court seeking a direction that the #NewParliamentBuilding should be inaugurated by the President of India. pic.twitter.com/IG8y4gQn4i
— ANI (@ANI) May 25, 2023PIL filed in Supreme Court seeking a direction that the #NewParliamentBuilding should be inaugurated by the President of India. pic.twitter.com/IG8y4gQn4i
— ANI (@ANI) May 25, 2023
नव्या संसद भवनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी आमंत्रित केले नाही. या कृत्याने संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाने ही याचिका दाखल केल्याची माहिती माध्यमातील एका वृत्तात देण्यात आली आहे.
शुक्रवारी होणार सुनावणी : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात यावे, असे निर्देश मागणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
राष्ट्रपतींना उद्घाटनाचा अधिकार नाकारण्यामागे अहंकार : गुरुवारी काँग्रेसचे सरचिटणीस आणि पक्षाचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी जनहित याचिकेसंदर्भात आणखी एक ट्विट केले होते. ते म्हणाले की, बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रांची येथील झारखंड उच्च न्यायालय संकुलाचे उद्घाटन केले आहे. हे देशातील सर्वात मोठे न्यायिक संकुल आहे. 28 मे रोजी नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा संवैधानिक विशेषाधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र, पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतींना उद्घाटनाचा अधिकार नाकारण्यामागे पुरुषाचा अहंकार आणि स्वत:च्या पदोन्नतीची इच्छा आहे. इंग्रजीत त्यांनी 'अशोका द ग्रेट, अकबर द ग्रेट, मोदी द इनॉग्रेट' असे लिहून मोदी सरकारवर टीका केली आहे.
19 राजकीय पक्षांनी कार्यक्रमावर टाकला बहिष्कार : नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असताना विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे. लोकसभा सचिवालयाने या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रित केलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारीच १९ विरोधी पक्षांनी नव्या संसदेच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकून संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा-
- New Parliament inauguration : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनातील फोटो हुकूमशाहीचे प्रतिम मानले जाईल-ठाकरे गट
- New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार
- Amit Shah Statement On Central Vista : संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार, गृहमंत्री अमित शाहांनी ठणकावले