ETV Bharat / bharat

'या' हत्येमागे कोणाचा हात ? काँग्रेसकडून निहंग प्रमुखाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचा फोटो व्हायरल - बाबा अमन सिंह यांच्याबरोबर नरेंद्र सिंह तोमर

मागील काही दिवसापूर्वी एका तरुणाच्या झालेल्या निघृण हत्येसंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये निहंग प्रमुख बाबा अमन सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहेत. बाबा अमन सिंह यांच्या ग्रुपच्या साथीदारांवर सिंघु बॉर्डरवर एक तरुणाची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

nihang-group-
nihang-group-
author img

By

Published : Oct 19, 2021, 4:07 PM IST

चंडीगढ - मागील काही दिवसापूर्वी एका तरुणाच्या झालेल्या निघृण हत्येसंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये निहंग प्रमुख बाबा अमन सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर दिसत आहेत. बाबा अमन सिंह यांच्या ग्रुपच्या साथीदारांवर सिंघु बॉर्डरवर एक तरुणाची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर यावरून वादंग उठले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता सत्य समोर येत आहे. रहस्यावरून पर्दा उठत आहे. या हत्येमागे कोण आहे ? कोण शेतकऱ्यांविरोधात षड्यंत्र करत आहे?. याचा अर्थ आहे की, सुरजेवाला यांचे म्हणणे आहे की, सिंघु बॉर्डर (Singhu Border) वर झालेल्या हत्येमध्ये भाजपचाच हात आहे. या षड्यंत्राचा भाग असलेला फोटो सुरजेवाला यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे.

  • सच सामने आ ही रहा है।

    परतें उठ रही हैं, पर्दा खुल रहा है।

    कौन असल में पर्दे के पीछे किसके साथ खड़ा है?

    कौन किसानों के खिलाफ़ क्या षड्यंत्र कर रहा है?#FarmersProtest https://t.co/wGhM9XSWpf

    — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण -

14 ऑक्टोबर रोजी सिंघु बॉर्डर वर एका 35 वर्षाच्या व्यक्तीची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप निहंग संघटनेवर लावण्यात आला होता. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये निहंग दावा करत आहेत, की या व्यक्तीला एका षड्यंत्रानुसार येथे पाठवले गेले होते. ज्यांनी कोणी याला येथे पाठवले होते त्यांनी पूर्ण ट्रेनिंगनुसार पाठवले होते.

व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की, या व्यक्तीने पवित्र गुरु ग्रंथ साहिबचे विटंबना करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच निहंगांनी त्याला पकडले व ओढत बाहेर काढले. त्याच्याकडे त्याला कोणी पाठवले, किती पैसे दिले व गावाचे नाव याची चौकशी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.