ETV Bharat / bharat

आसाममध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान, वाचा सविस्तर... - आसाम विधानसभा निवडणूक लेटेस्ट न्यूज

आसाम विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या 1 एप्रिलला होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आणि काँग्रेस प्रणीत महाज्योत या पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. या टप्प्यात भाजपा 34, काँग्रेस 28, एआययूडीएफ 7, एजेपी 6, एजेपी 19, सीपीआय(एमएल) एल 3, अपक्ष 176 आणि इतर पक्षाचे 72 उमेदवार रिंगणात आहेत. 13 जिल्ह्यातील 39 मतदारसंघात 10 हजार 592 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. विविध पक्षाच्या 345 उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल. एकूण उमेदवारांमध्ये 26 महिला उमेदवार आहेत.

आसाम
आसाम
author img

By

Published : Mar 31, 2021, 9:01 PM IST

गुवाहाटी - आसाम विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या 1 एप्रिलला होणार आहे. 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात, 39 विधानसभा मतदार सघांतून 345 उमदेवार आपलं नशीब आजमावणार आहेत. 73 हजार 44 लाख 631 नागरिक मतदानाचा हक्क बजावतील.

Phase 2 elections in Assam
73 हजार 44 लाख 631 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार

गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचार दौऱ्यात काँग्रेस आणि भारतीय जनतापक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांचे रोड शो, घणाघाती भाषणे यांनी हा टप्पा अगदी गाजवून सोडला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए आणि काँग्रेस प्रणीत महाज्योत या पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. या टप्प्यात भाजपा 34, काँग्रेस 28, एआययूडीएफ 7, एजेपी 6, एजेपी 19, सीपीआय(एमएल) एल 3, अपक्ष 176 आणि इतर पक्षाचे 72 उमेदवार रिंगणात आहेत. 13 जिल्ह्यातील 39 मतदारसंघात 10 हजार 592 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. विविध पक्षाच्या 345 उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल. एकूण उमेदवारांमध्ये 26 महिला उमेदवार आहेत.

Phase 2 elections in Assam
विविध पक्षाच्या 345 उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेटीत बंद होईल

राज्यातील 8-अलगपूर मतदारसंघात 19 उमेदवार मैदानात आहेत. तर सर्वांत कमी 2 उमेदवार 69-उडलगुरी मतदारसंघात उभे आहेत. राज्यात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी केंद्र आणि राज्य सशस्त्र पोलीस दलासह सुरक्षा कर्मचार्‍यांच्या एकूण 310 कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत.

आसाम विधानसभा निवडणूक 2021

  • एकूण मतदारसंघ : 126
  • आसाममध्ये तीन टप्प्यांत निवडणूक
  • पहिला टप्प्यातील 47 जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान झालं
  • दुसरा टप्प्यातील 39 जागांसाठी 1 एप्रिल रोजी मतदान
  • तिसऱ्या टप्प्यासाठी 40 जागांवर 6 एप्रिल रोजी मतदान
  • 2 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

भाजपापुढे सत्ता राखण्याचे आव्हान -

काँग्रेस राज्यात कमी पडली असली, तरी भाजपाला यावेळी सत्ता मिळवणे कठिण असल्याचे चित्र आहे. आसाममध्ये धार्मिक बहुलता आहे. एनआरसी आणि सीएए कायद्यांमुळे भाजपापुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. या कायद्यांविरोधात आसाममध्ये मोठे आंदोलन झाले होते. मात्र, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाचे जोरात प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा - बिग फाईट ! पश्चिम बंगालमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता-सुवेंदू थेट भिडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.