ETV Bharat / bharat

आणीबाणीच्या काळात लस वापरासाठी फायजर कंपनीने मागितला परवाना

आणीबाणीच्या काळात कोरोना लस वापरण्याचा परवाना फायजर कंपनीने मागितला आहे. भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाकडे एमर्जन्सी काळात लसीचा परवाना मागणारी फायजर ही पहिलीच कंपनी ठरली आहे.

फायजर कंपनी
फायजर कंपनी
author img

By

Published : Dec 6, 2020, 9:28 PM IST

नवी दिल्ली - आणीबाणीच्या काळात कोरोना लस वापरण्याचा परवाना फायजर कंपनीने मागितला आहे. भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाकडे एमर्जन्सी काळात लसीचा परवाना मागणारी फायजर ही पहिलीच कंपनी ठरली आहे. कंपनीला इंग्लड आणि बहारीन देशात असा परवाना मिळाल्यानंतर फायजर इंडियाने भारतातही यासाठी अर्ज दाखल केला आहे.

सीरमही करणार अर्ज दाखल

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनीही परवाना मागणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाल यांनी मोदींच्या व्हॅक्सिन दौऱ्यानंतर सांगितले. दोन आठवड्यांच्या आत अर्ज दाखल करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. कोविशिल्ड ही लस सीरम कंपनीकडून तयार करण्यात येत असून लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

४ डिसेंबरला केला अर्ज दाखल

फायजर कंपनीने भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाकडे तसा अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार कंपनीने भारतात लस आयात, विक्री आणि वाहतूक करण्याची परवानगी मागितली आहे. ४ डिसेंबरला कंपनीने हा अर्ज दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

फायजर आणि बायोएनटेक कंपनीने मिळून mRNA तंत्रज्ञान वापरून BNT162b2 ही लस तयार केली आहे. मागील बुधवारी फायजर कंपनीने तयार केलेल्या लसीला इंग्लडने सर्वप्रथम आणीबाणीच्या काळात वापरासाठी मान्यता दिली. ही लस ९५ टक्के सुरक्षित असल्याचे मानले जात आहे. बहारीन देशाने ह्या लसीच्या वापरास परवानगी दिली असून कंपनीने अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाकडेही अर्ज दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.