कोलकाता - पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यात शनिवारी रात्री दुर्गा विसर्जन केल्यानंतर परतणाऱ्या लोकांवर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्बने हल्ला केला. यावेळी अनेक वाहनांची तोडफोडही करण्यात आली. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, पैसे देण्यावरून दोन गटांमध्ये भांडण झाले. एक गट दुर्गा विसर्जनानंतर परतत होता, दरम्यान दुसरा गट आला आणि दारू खरेदी करण्यासाठी पैसे मागू लागला. यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली सुरू झाली. प्रकरण इतके वाढले की दुसऱ्या गटाने वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच पेट्रॉल बॉम्बने हल्या केला. मात्र, पोलिसांनी बॉम्ब हल्ल्याची शक्यता नाकारली आहे.
हेही वाचा - सामना 'रोखठोक' : सत्य बोलणाऱ्यांवर तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य!