ETV Bharat / bharat

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या महान खुदीराम बोस यांची शौर्यगाथा!

author img

By

Published : Aug 16, 2021, 6:04 AM IST

Updated : Aug 16, 2021, 10:38 AM IST

स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फासावर जाणारे खुदीराम बोस हे देशातील महान स्वातंत्र्य सैनिकांमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यांच्या धाडसाने इंग्रजांनाही धडकी भरली होती. 1908 मध्ये मुझफ्फरपूरमधून त्यांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. इंग्रज राजवटीला हादरे देणाऱ्या खुदीराम बोस यांची शौर्यगाथा जाणून घेऊया, या खास रिपोर्टमधून..

स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या महान खुदीराम बोस यांची शौर्यगाथा!
स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या महान खुदीराम बोस यांची शौर्यगाथा!

मुझफ्फरपूर : स्वातंत्र्य लढ्यात वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी फासावर जाणारे खुदीराम बोस हे देशातील महान स्वातंत्र्य सैनिकांमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यांच्या धाडसाने इंग्रजांनाही धडकी भरली होती. 1908 मध्ये मुझफ्फरपूरमधून त्यांनी स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. इंग्रज राजवटीला हादरे देणाऱ्या खुदीराम बोस यांची शौर्यगाथा जाणून घेऊया, या खास रिपोर्टमधून..

मुझफ्फरपूर ही बोस यांची कर्मभूमी

खुदीराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी पश्चिम बंगालच्या मिदनापूर इथे झाला होता. मात्र मुझफ्फरपूर ही त्यांची कर्मभूमी होती. 1905 मध्ये पश्चिम बंगालच्या फाळणीविरोधात खुदीराम बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. 28 फेब्रुवारी 1906 रोजी त्यांना पहिल्यांदा अटक झाली होती. मात्र इंग्रजांच्या हातावर तुरी देत ते यशस्वीपणे फरार झाले होते. बोस यांनी क्रांतीकारकांमध्ये एक नवी ऊर्जा भरण्याचे काम केले होते. खुदीराम बोस हे अतिशय निडर होते. जेव्हा त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हाही ते हसायला लागले होते. हे पाहून त्यांना शिक्षा ठोठावणारे न्यायाधीशही बुचकळ्यात पडले होते. यावेळी त्यांनी बोस यांना तुम्हाला काय शिक्षा ठोठावली आहे ते कळले आहे का असा प्रश्न विचारला होता. यावेळी बोस म्हणाले होते की, मला निर्णय पूर्ण समजला आहे, एवढेच नाही, तर वेळ मिळाला तर तुम्हालाही मी बॉम्ब बनविणे शिकवून देईन. अशा थोर विभूतींमुळेच आज आपण देशात स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.

बोस यांनी इंग्रज राजवटीला दिले हादरे

मुझफ्फरपूरमधून खुदीराम बोस यांनी इंग्रज राजवटीला हादरे दिले. त्यांची कर्मभूमी असलेल्या मुझफ्फरपूरमध्ये आजही त्यांच्या आठवणी संग्रहित आहेत. मात्र यापैकी काही ठेवा हा सरकारी अनास्थेमुळे नष्टही होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय पंकज यांच्या मते मुझफ्फरपूरला बोस यांचा इतका निकटचा सहवास मिळूनही इथे त्यांच्याविषयीच्या माहितीचा अभाव आहे. ऐतिहासिक ठिकाणांमधून आपल्याला इतिहास माहिती होतो. अशा ठिकाणी गेल्यावर आपल्यात एक ऊर्जा संचारते. त्यामुळेच अशा क्रांतीकारकाने वास्तव्य केलेले हे ठिकाण सर्वसामान्यांसाठी खुले केले पाहिजे असे संजय पंकज यांनी म्हटले आहे.

19 व्या वर्षी इंग्रजांनी दिली फाशी

इंग्रज सरकारला मुझफ्फरपूरच्या या क्रांतीकारकाची इतकी भीती वाटत होती की, केवळ 19 व्या वर्षीच त्यांनी त्यांना फाशी दिली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देत खुदीराम बोस इतिहासात अमर झाले. मुझफ्फरपूरच्या केंद्रीय तुरुंगातील ज्या बराकमध्ये बोस यांना ठेवण्यात आले होते तसेच जिथे त्यांना फाशी देण्यात आली होती ती दोन्ही ठिकाणे इथे संरक्षित ठेवण्यात आली आहेत. मुझफ्फरपूरचे केंद्रीय तुरूंग शहीद खुदीराम बोस तुरुंगाच्या नावे ओळखले जाते. बोस यांच्या शहीद दिनी इथे कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. मात्र दुर्दैव म्हणजे इथे आजही सामान्यांना प्रवेश दिला जात नाही.

ठेवा जपायला हवा

ज्येष्ठ वकिल डॉ. एस के झा यांच्या मते नागरिकांना खुदीराम बोस यांचा विसर पडत चालला आहे. बोस यांच्यावर जी कारवाई झाली होती त्याची खटल्याची आणि निर्णयाची प्रत मुझफ्फरपूरमध्ये असायला हवी होती. मात्र ही प्रत कोलकाता इथे असल्याचे सांगत यावर त्यांनी खेद व्यक्त केला आहे. 19 व्या वर्षी हसत हसत फासावर जाणाऱ्या खुदीराम बोस यांच्या आठवणी आजही मुझफ्फरपूरमध्ये आहेत. मात्र त्यांच्या हौतात्म्याची कहाणी सांगणारे ठिकाण आजही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. हे ठिकाण सामान्यांसाठी खुले करण्याची गरज आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला या महान स्वातंत्र्य सैनिकाची अमर गाथा कळू शकेल.

हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या

Last Updated : Aug 16, 2021, 10:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.