ETV Bharat / bharat

Deposite Forfeited in Goa : गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीसह 'या' पक्षांचे डिपॉझिट जप्त; वाचा, काय असते प्रक्रिया? - गोवा शिवसेना डिपॉझिट जप्त

गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Result 2022) जाहीर झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर डिपॉझिट जप्तीची (Deposite Forfeited in Goa) चर्चा सुरू होते. दरम्यान, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 अन्वये जर एखादा उमेदवार लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवत असेल तर त्याला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते. गोव्यात एकूण 301 उमेदवारांपैकी 205 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त (Deposite Forfeited in Goa) झाले आहे.

partywise Deposite Forfeited
डिपॉझिट जप्त झालेले पक्ष
author img

By

Published : Mar 12, 2022, 7:54 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Result 2022) जाहीर झाले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर डिपॉझिट जप्तीची (Deposite Forfeited in Goa) चर्चा सुरू होते. दरम्यान, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 अन्वये जर एखादा उमेदवार लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवत असेल तर त्याला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम जमा करावी लागते. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये ही रक्कम वेगवेगळी असते. निवडणुकीत ठराविक मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते. मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला 16.66 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. पाहुयात गोवा विधानसभा निकालानंतर कोणत्या पक्षाचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Deposite Forfeited in Goa
कोणत्या पक्षाच्या किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

पाहा कोणत्या पक्षाच्या किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त -

आम आदमी पार्टी - 35 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

तृणमुल काँग्रेस - 21 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

भाजप - 5 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

गोवा फॉरवर्ड पार्टी - 1 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

गोवंचो स्वाभिमानी पार्टी - 4 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

अपक्ष - 58 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

काँग्रेस - 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

जय महा भारत पार्टी - 6 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

महाराष्ट्रवादी गोमंतक - 7 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

राष्ट्रवादी - 13 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

रिवॉल्युशन गोंस पार्टी - 32 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

संभाजी ब्रिगेड पार्टी - 3 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

शिवसेना - 11 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

गोव्यात एकूण 301 उमेदवारांपैकी 205 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

डिपॉझिट कधी जप्त होते?

निवडणूक आयोग नावनोंदणी करणाऱ्या उमेदवारांकडून निश्चित रक्कम जमा करतो. निवडणुकीत ठराविक मते न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते. मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला 16.66 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. असे न करणाऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते. त्याचबरोबर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला 1/6 मते मिळणे आवश्यक आहे.

रक्कम परत मिळते?

उमेदवाराला सिक्युरिटी डिपॉझिट वाचवण्यासाठी 1/6 पेक्षा जास्त मते मिळवावी लागतात, परंतु जर तो उमेदवार विजयी झाला तर सिक्युरिटी डिपॉझिट त्याला परत केले जाते. याशिवाय 1/6 पेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या उमेदवाराला ही रक्कम परत केली जाते. याशिवाय उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास त्याला रक्कम परत केली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.