कोट्टायम (केरळ) - लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या पार्टनरला जबरदस्ती करणाऱ्या पार्टनर स्वॅपिंग रॅकेट (partner swapping racket) प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले एर्नाकुलम, कोट्टायम आणि अलाप्पाझा येथील आहेत. तर पाच जण करुकच्चल पोलीस आणि एक जण एर्नाकुलम येथील आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांची नावे आणि त्यासंबंधित माहिती अजून जाहीर केलेली नाही. आणि एकजण सौदीला पळून गेला. त्याला केरळला परत आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. ( Partner Swapping Racket in Kerala )
मेसेंजर, टेलिग्राम, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपल शेअरिंग ग्रुप्स नावाने तयार केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बायकोला दुसऱ्याच्या हवाली करणाऱ्यांना पैसे दिले जात आहेत. सुमारे हजारो लोक गटांमध्ये सक्रिय आहेत.
महिलेने केली तक्रार -
कोट्टायम येथील पठाणड येथील एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली. तिने आरोप केला की, तिच्या पतीने तिला दुसऱ्या चार लोकांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणात आणखी लोक गुंतले असल्याचा संशय आहे. यामुळे लवकरच आणखी अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तर याप्रकरणी पोलीस महिलांचीही चौकशी करत आहेत.
2019मध्ये घडली होती अशी घटना -
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने विविध पथके तयार केली. चंगणशेरी येथील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आणखी दोघांना अटक केली आहे. याआधी २०१९ मध्ये कायमकुलम (अलाप्पुझा जिल्हा) येथे अशीच घटना घडली होती. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.