ETV Bharat / bharat

Parliament Budget Session : राहुल गांधींनी माफी मागण्याकरिता सत्ताधारी आक्रमक, गोंधळातच दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब - भाजप अध्यक्ष जेपी नड्डा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. आजही कामकाज चालविण्याबाबत पक्षांमध्ये एकमत न झाल्याने संसदेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

Parliament
संसद
author img

By

Published : Mar 17, 2023, 11:03 AM IST

Updated : Mar 17, 2023, 11:56 AM IST

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आज पाचवा दिवस आहे. आजही गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. तर जेपीएचे खासदार राहुल गांधींना माफी मागण्याचे आवाहन करत होते.

  • #WATCH | Rahul Gandhi must apologise...In India’s history since independence, even in most difficult times, none of India’s leaders ever appealed to foreign powers to act against the Indian govt. This is a very serious matter in independent India’s history: BJP President JP Nadda pic.twitter.com/V1GWfhouDL

    — ANI (@ANI) March 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चार दिवसांपासून कामकाज ठप्प : गेल्या चार दिवसांपासून सततच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. आज शुक्रवारीही संसदेचे कामकाज चालवण्याबाबत पक्षांमध्ये एकमत झाले नाही. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातील लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरून भाजपचे खासदार सभागृहात गोधळ घालत आहेत.

राहुल गांधींनी लोकसभेत वेळ मागितली : राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, आपण लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असून या प्रकरणी लोकसभेत आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष त्यांना बोलण्यासाठी वेळ देणार की सभागृहातील गदारोळ चालूच राहणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शुक्रवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, राहुल गांधींना बिनशर्त माफी मागावी लागेल. ते म्हणाले की, राहुल गांधींनी परदेशात देशाचा अपमान केला आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे.

अदानी मुद्यावर जोसीपीची मागणी कायम : दुसरीकडे, अदानी समुहावरील हिंडेनबर्गच्या अहवालाची चौकशी करण्यासाठी जेपीसीच्या मागणीवरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात गोंधळ घालत आहेत. याशिवाय विरोधी पक्षांचा एक गट सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करतो आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी नियम 267 अंतर्गत राज्यसभेत कामकाजावर निलंबनाची नोटीस दिली असून त्यांनी अदानी समूहाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली आहे.

राज्यसभेत कामकाज निलंबनाची नोटीस : काँग्रेसचे खासदार रणजीत रंजन यांनीही याच मुद्द्यावर नियम 267 अन्वये राज्यसभेत कामकाज निलंबनाची नोटीस दिली आहे. तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे. ज्यामध्ये संविधानाच्या कलम 105 नुसार संसद सदस्यांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सार आणि आत्मा यावर चर्चा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना देऊन अदानी मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : Reservation In CISF : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, माजी अग्निवीरांना सीआयएसएफमध्ये मिळणार १० टक्के आरक्षण

Last Updated : Mar 17, 2023, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.