ETV Bharat / bharat

नियमांचा भंग करत समुद्रकिनारी बेकायदा रस्त्याची निर्मिती, रस्त्यावर भाजपचे वृक्षारोपण - new luxury resort

करनझाले बीचवर जाण्यासाठी धनदांडग्यांची सोय व्हावी म्हणून, करण्यात आलेल्या बेकायदा रस्त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. रस्त्याचा वाद पेटल्यांनंतर सोमवारी काँग्रेस, आप आणि भाजपच्या महसूलमंत्री जेनिफर मोन्सरात यांनी या बेकायदा रस्त्यावर वृक्षारोपण केले. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

विठ्ठल-रुक्मिणीला सुरेख अलंकाराचा साज
विठ्ठल-रुक्मिणीला सुरेख अलंकाराचा साज
author img

By

Published : Oct 13, 2021, 11:36 AM IST

Updated : Oct 13, 2021, 11:53 AM IST

पणजी- बेकायदेशीरपणे बनविण्यात आलेल्या रस्त्यावर आप, काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी वृक्षारोपण केले. त्यात श्रेयवादावरून काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपला टार्गेट करत त्यांच्याच कृपेने हा रस्ता झाल्याचा आरोप केला. पणजी महानगर पालिका आणि पणजी मतदारसंघावर मोन्सरात कुटुंबीयांची सत्ता आहे, त्यामुळेच आपल्या लोकांच्या टीकेचा सामना करण्याअगोदर महसूलमंत्री जेनिफर मोन्सरात आणि पणजीचे महापौर रोहित मोन्सरात यांनी या रस्त्यावर वृक्षारोपण केले, त्यामुळेच आता वादाला तोंड फुटले.

रस्त्यावर भाजपचे वृक्षारोपण
भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि आप पक्षाचे राजकीय नाट्य-

राज्यात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यामुळे भाजपला धारेवर धरायची एकही संधी विरोधक सोडत नाही, त्यामुळे या बेकायदा रस्ता प्रकरणावरून राजकीय आप आणि काँग्रेस ने भाजपला टार्गेट करत त्यांच्यावर टीकेचा भडीमार करत त्यांच्याच आशीर्वादाने हा रस्ता झाल्याची टीका आपच्या नेत्या सिसिल रोद्रीगस यांनी केली.

दोषींवर कारवाई करणार-

पर्यावरण नियमांचा भंग करत रस्ता बनविल्याप्रकरणी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती महापौर रोहित मोन्सरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सरात यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

पणजीतील मिरामर-दोना पावला मार्गावर असणाऱ्या एका प्रतिशयत हॉटेलने आपल्या पर्यटकांना थेट समुद्रकिनारी जाता यावे यासाठी पर्यावरण नियमांचा भंग करत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्या बनविला होता. मात्र राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या आंदोलनानंतर हा रस्ता पुनर्स्थापित करण्यासाठी भाजपने तेथे वृक्षारोपण केले होते याचवेळी आम आदमी आणि काँग्रेसनेही निषेध करण्यासाठी वृक्षरोपण कार्यक्रम केला. एकाचवेळी तिन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्र आल्याने राजकीय चिखलफेक करत त्यांनी एकमेकांचा चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा - ओबीसी अध्यादेश आधी काढला असता तर फायदा झाला असता - पंकजा मुंडे

हेही वाचा - मी मुख्यमंत्री नसल्याचे जनतेने मला जाणवू दिले नाही - देवेंद्र फडणवीस

Last Updated : Oct 13, 2021, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.