नवी दिल्ली : पाकिस्तानी पत्रकार अर्शद शरीफ यांची केनियामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती त्यांच्या पत्नी जवरिया सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटरून दिली आहे. तसेच, 'कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. (Journalist Arshad Sharif was shot dead) ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली आमच्या कुटुंबाचे फोटो, खासगी माहिती आणि रुग्णालयतील अखेरचे फोटो दाखवू नका', अशी विनंती त्यांनी केली आहे. 'आज मी माझा मित्र, पती आणि आवडते पत्रकार गमावले आहेत असही त्या म्हणाल्या आहेत.
अर्शद शरीफ मुलाखतीमुळे वादात सापडले होते - या वर्षी ऑगस्टमध्ये, पोलिसांनी शरीफ, एआरवाय डिजिटल नेटवर्कचे अध्यक्ष, सीईओ सलमान इक्बाल, न्यूज कंटेंट आणि चालू घडामोडींचे प्रमुख अम्माद युसूफ, अँकर खवर गुम्मन आणि एक निर्माता यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे नेते डॉ. शाहबाज गिल यांच्या मुलाखतीशी संबंधित होते. 8 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेली ही मुलाखत वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
अर्शद शरीफ यांच्या निधनाची बातमी - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार अर्शद शरीफ यांच्या हत्येवर एक निवेदन जारी केले आहे. केनियातील प्रख्यात पत्रकार आणि अँकर अर्शद शरीफ यांच्या अकाली निधनामुळे परराष्ट्र मंत्रालयाला खूप दुःख झाले आहे. केनियातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना 24 ऑक्टोबर रोजी सकाळी अर्शद शरीफ यांच्या निधनाची बातमी मिळाली, असे निवेदनात म्हटले आहे.
मिशनच्या अधिकाऱ्यांसह उच्चायुक्त - उच्चायुक्तांनी त्यानुसार पोलीस प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालय आणि इतर विभागांशी संपर्क साधला आहे. उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाशीही पुष्टी करण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. केनियन वंशाच्या पाकिस्तानी नागरिकांशीही संपर्क साधण्यात आला. मिशनला माहिती देण्यात आली की, नैरोबीच्या चिरोमो येथील फ्युनरल हाऊसमध्ये मृतदेह ठेवण्यात आला आहे. मिशनच्या अधिकाऱ्यांसह उच्चायुक्त घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शरीफ यांच्या मृतदेहाची खात्री केली आहे.