इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तरेकडील सियालकोट शहरात रविवारी भीषण स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंजाब प्रांतातील कॅन्टोन्मेंट क्षेत्राजवळ स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. द डेली मिलापचे संपादक ऋषी सुरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पाकिस्तान - उत्तर पाकिस्तानमधील सियालकोट लष्करी तळावर अनेक स्फोट. हे दारुगोळा साठवण क्षेत्र असल्याचे प्राथमिक संकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सियालकोटमध्ये स्फोटानंतर आग लागली. स्फोटाचे आणि आगीचे कारण समजू शकले नाही.
Pakistan: सियालकोट कॅंट परिसरात मोठा स्फोट
पाकिस्तानच्या उत्तरेकडील सियालकोट शहरात रविवारी मोठा स्फोट झाला.