नवी दिल्ली - देशात आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 69 हजार 241 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशभरात 6 लाख 58 हजार 909 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात काल नव्या 89 हजार 129 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 714 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत 1 लाख 64 हजार 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी 44 हजार 202 रुग्ण बरे झाले.
देशभरात काल 7 कोटींहून अधिक लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार झाला. देशभरात आतापर्यंत 7 कोटी 30 लाख 54 हजार 295 नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. काल 30 लाख 93 हजार 795 नागरीकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
हेही वाचा - नजरचूक! हा तर 'धक्कादायक विनोद' म्हणावा लागेल