ETV Bharat / bharat

Patna Opposition Meeting: विरोधकांची एकजूट कधीच शक्य नाही, पाटणामध्ये फोटो सेशन आहे - अमित शाह

भाजपला कशाप्रकारे पराभूत करायचे यासाठी विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. यासाठी आज पाटणामध्ये विरोधी पक्ष बैठक घेत आहे. या बैठकीवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

शाहांची विरोधकांच्या बैठकीवर टीका
शाहांची विरोधकांच्या बैठकीवर टीका
author img

By

Published : Jun 23, 2023, 2:31 PM IST

शाहांची विरोधकांच्या बैठकीवर टीका

जम्मू : पाटणामध्ये विरोध पक्षांची बैठक होत आहे. भाजपला कशाप्रकारे पराभूत करायचे यासाठी विरोधी पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. या बैठकीवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. पाटणामध्ये फक्त फोटो सेशन चालू आहे. विरोधक भाजप आणि मोदींना आव्हान देत आहेत, परंतु मी विरोधक नेत्यांना सांगू इच्छित आहे की, तुम्ही सर्वजण कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे. अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. तेथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर तोफ डागली

बैठक फक्त फोटो सेशन : पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठकी होत आहे. या बैठकीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्लाबोल केला आहे. शाह म्हणाले की, विरोधी पक्ष कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. पाटणामध्ये विरोधक पक्षांची बैठक चालू आहे. पण ही बैठक एक फोटो सेशन आहे. विरोधी पक्ष एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. जर एकत्र आले तरी ते मोदींना पराभूत करू शकत नाहीत. भाजप 2024 मध्ये 300 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होतील, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. सर्व नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन आम्ही पंतप्रधानांना आव्हान देऊ असा संदेश द्यायचा आहे, असे अमित शाह म्हणाले.

पाटणामध्ये फोटो सेशन चालू आहे. विरोधक कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. जर ते एकत्र आले तरी पंतप्रधान मोदींना हरवणं त्यांना शक्य होणार नाही. साधरण 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होतील. - अमित शाह, केंद्रीय गृह मंत्री

जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर : अमित शाह 23 जूनपासून जम्मू-कश्मीरच्या दोन दिवसीय दौऱयावर आहेत. या दरम्यान त्यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधक कधीच एकत्र येऊ शकत नसल्याचे शाह म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांची बैठक : पाटणामध्ये विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. विरोधी ऐक्याला ठोस स्वरूप देण्यास अजेंडाही ठरवावा लागेल. भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांचे एकत्र येणे ही देशाच्या राजकारणातील मोठी घटना आहे. विरोधी पक्षाचे स्वतःचे हितसंबंध आहेत ही दुसरी बाब आहे. या बैठकीत विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभेत भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती ठरवणार आहे.

हेही वाचा -

  1. Kharge Address Party workers : ... तर संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक जिंकू - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
  2. Patna Opposition Meeting : विरोधी पक्षांची बैठक सुरू, २०२४ ला भाजपला पराभूत करण्याकरिता काय आखणार रणनीती?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.