नवी दिल्ली INDIA Meeting : विरोधी आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) ची पुढील बैठक १९ डिसेंबरला राजधानी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत मुख्य अजेंडा तयार करणे, जागावाटप आणि संयुक्त रॅली आयोजित करण्याच्या कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी 'X' वरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.
-
INDIA की पार्टियों के नेताओं की चौथी बैठक मंगलवार 19 दिसंबर 2023 को नई दिल्ली में दोपहर 3 बजे से होगी।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The 4th meeting of the leaders of INDIA parties will be held on Tuesday December 19th, 2023 in New Delhi at 3pm.
जुड़ेगा भारत
जीतेगा INDIA!
">INDIA की पार्टियों के नेताओं की चौथी बैठक मंगलवार 19 दिसंबर 2023 को नई दिल्ली में दोपहर 3 बजे से होगी।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 10, 2023
The 4th meeting of the leaders of INDIA parties will be held on Tuesday December 19th, 2023 in New Delhi at 3pm.
जुड़ेगा भारत
जीतेगा INDIA!INDIA की पार्टियों के नेताओं की चौथी बैठक मंगलवार 19 दिसंबर 2023 को नई दिल्ली में दोपहर 3 बजे से होगी।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) December 10, 2023
The 4th meeting of the leaders of INDIA parties will be held on Tuesday December 19th, 2023 in New Delhi at 3pm.
जुड़ेगा भारत
जीतेगा INDIA!
'मैं नहीं, हम'चा नारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची एकता कायम ठेवत 'मैं नहीं, हम'चा नारा देत पुढे जाण्याचा निर्धार आहे.
पर्यायी सकारात्मक अजेंडा आणणार : ते म्हणाले की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसमोर पर्यायी सकारात्मक अजेंडा आणण्याचं आव्हान आहे. २०२४ मध्ये भाजपाचा मुकाबला करण्यासाठी पक्ष चौकटीबाहेरचा विचार करेल, असं त्यांनी मान्य केलं. ते म्हणाले की, 'मैं नहीं, हम' ही एक संभाव्य घोषणा आहे ज्यावर विरोधी पक्ष मोदींचा प्रतिकार करण्यासाठी काम करतील.
गौतम अदानींचा मुद्दा उपस्थित केला जाईल : ते पुढे म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे' दरम्यान काँग्रेसनं वाढती आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, चलनवाढ आणि महागाई हे मुद्दे उपस्थित केले. पुढील लोकसभा निवडणुकीतही हे मुद्दे वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की I.N.D.I.A आघाडी मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दहा वर्षांच्या कामगिरीवर प्रकाश टाकेल. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्योगपती गौतम अदानींचा मुद्दाही उपस्थित केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी उपस्थित राहतील : सूत्रांचं म्हणणं आहे की, I.N.D.I.A. आघाडी जात-आधारित जनगणना, किमान आधारभूत किंमतीची कायदेशीर हमी (MSP) आणि कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा हे मुद्दे उचलू शकते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी १७ ते १९ डिसेंबर दरम्यान दिल्लीत असतील. त्या या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य वरिष्ठ नेत्यांची उपस्थितीही सुनिश्चित करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा :